माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि त्यांच्या टोळीने अशी केली लूट

आरोप प्रत्यारोप यातून संजय पुनामिया यांनी अग्रवाल यांच्यावर मुंबईसह इतर जिल्हात अग्रवाल यांच्यावर 18 गुन्हे नोंदवले.
माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि त्यांच्या टोळीने अशी केली लूट
माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि त्यांच्या टोळीने अशी केली लूटSaam Tv

मुंबई: बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल आणि संजय पुनामिया यांनी भागीदारीत मे. बालाजी एंटरप्राइज व मे. राजा रामदेव इंटरप्रायजेस नावाची कंपनी 2008 मध्ये सुरू केली होती. या दोन कंपन्यांद्वारे दोघांनी 2006 ते 2011 पर्यंत भागीदारीत व्यवसाय केला. माञ गुंतवणूकीतील नफा व हिशोबासह इतर कारणांवरून दोघांमध्ये टोकाचे वाद झाल्याने ही भागीदारी 2011 मध्ये संपुष्ठात आली. माञ आरोप प्रत्यारोप यातून संजय पुनामिया यांनी अग्रवाल यांच्यावर मुंबईसह इतर जिल्हात अग्रवाल यांच्यावर 18 गुन्हे नोंदवले.

2016 मध्ये संजय पुनामिया यांनी त्यांचा मिञ मनसुखलाल गांधी यांच्या तक्रारीवरून अग्रवाल यांच्यावर ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यावेळी अग्रवाल हे न्यायालयीन कोठडीत होते. त्यावेळी पुनामिया याने त्याचा सहकारी सुनिल जैनने अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्याकडे त्यांचा हस्तक मनोज घोटकर याला पाठवले होते.

माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि त्यांच्या टोळीने अशी केली लूट
Breaking परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

घोटकरने पुनामिया हे परमबिर सिंह (Parambir Singh) यांचे मिञ आहेत. ते परमबिर यांचे आर्थिक व्यवहार पाहतात. असे सांगितले. घोटकरने अग्रवाल यांना या गुन्ह्यांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी व नवीन गुन्हे नोंद होण्यापासून थांबवायचे असतील, तर संजय पुनामिया व परमबिर सिंह यांना संबधित जागा विकण्यास व 15 कोटी 50 लाख ऐवढ्या रक्कमेची मागणी केली. हे न केल्यास पुढची 5 वर्ष जेलमध्ये रहावे लागेल अशी धमकी दिली. त्यावेळी पुनामिया यांनी पोलिसांसाठी ही मोठ्या पैशांची मागणी केल्याचा आरोप अग्रवाल यांनी तक्ररीत केला आहे.

दरम्यान 30 मार्च रोजी अग्रवाल यांची पून्हा संजय पुनामिया व घोटकर यांच्यात मिटिंग झाली. त्यावेळी संजय पुनामिया यांनी संबधित मालमत्तेच्या करारावर जबरदस्ती सह्या घेतल्या. त्यावेळी पुनामिया यांनी प्रकरण मिटले, माञ DCP अकबर पठाण यांना पैसे द्यावे लागतील असे सांगत, शरद अग्रवालला घेऊन अकबर पठाण यांच्या अंधेरीतील कार्यालयत गेले होते. त्यावेळी अकबर पठाण यांनी 50 लाखांची मागणी केली. तसेच भाईंदरमधील 2 BHK फ्लँट नावावर करण्यास धमकावले. तसे न केल्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची धमकी दिल्याचे अग्रवाल याने तक्रारीत म्हटले आहे.

त्यानुसार परमबिर सिंह यांच्या घरी पुतण्या शरदने अग्रवाल व शुभम अग्रवाल यांची भेट घडवून दिली. त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे DCP पराग मणेरे हे देखील उपस्थित होते. अटक टाळण्यासाठी अग्रवाल यांनी पुनामियाला 15 कोटी 50 लाखांचा धनादेश व 25-25 लाख दोन हप्त्याने अग्रवाल यांचा कर्मचारी देवेंद्र पांचाळ यांच्याकडून पुनामिया यांच्याकडे पाठवले. त्यानंतर पुनामिया अग्रवाल याला ACP श्रीकांत शिंदेकडे घेऊन गेले. मोक्का गुन्ह्यात मदतीसाठी श्रीकांत शिंदेंना 25 लाख देण्यासाठी दटावले. त्यानुसार अग्रवालने 25 एप्रिल 2021 ला ते पैसे संजय पुनामिया यांच्याकडे दिले. त्यानंतर परमबिर सिंह व पुनामिया यांच्यात झालेल्या सेटलमेंट नुसार अग्रवाल यांच्यकडे 11 कोटींसाठी पुनामियाने तगादा लावला. यावेळी पुनामियाने पोलिसांचीही मदत घेऊन कुटुंबियांवर पाळत ठेवल्यचा आरोप केला आहे.

परमबिर सिंह हे मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी पदाचा दुरउपयोग करून अग्रवाल यांच्यावर त्यांनी अंडरवल्ड डाँन छोटा शकील मार्फत पुनामियाला धमकी दिल्याच्या आरोपाखाली मोक्कोचा गुन्हा नोंदवून अटकेची धमकी दिली. तसेच पुतण्याचे सही घेऊन खोटे दस्तावेज बनवून अग्रवाल यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून घेतली. याप्रकरणी अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह, डीएसपी अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com