Car Accident : पाम बीच मार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

Palm Beach Road Accident: वाशीकडून बेलापूरकडे जाणाऱ्या कारसोबत हा अपघात घडला.
Palm Beach Accident News
Palm Beach Accident Newsसिद्धेश म्हात्रे

सिद्धेश म्हात्रे

बेलापूर, नवी मुंबई : नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. पामबीच मार्गावर अक्षर चौकालगत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात (Accident) नितीन मॅथ्यू आणि हर्षल या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये दुभाजकाचे रेलिंग, पामची झाडे आणि विजेचा खांब देखील तुटलाय. वाशीकडून बेलापूरकडे (CBD Belapur) जाणाऱ्या कारसोबत हा अपघात घडला. (Palm Beach Accident News)

हे देखील पाहा -

कार अतिवेगात असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे होंडा अॅकॉर्ड कार (Honda Accord) वाशीहून बेलापूरच्या दिशेने जात होती. अक्षर चौकाजवळ हा अपघात झाला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरी व्यक्ती ही व्हेंटीलेटरवर आहे. अपघात झाला तेव्हा गाडीचा वेग १२० ते १४० किमी प्रति तास इतका असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करत चालक नितीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com