'शिवसेनेचा खरा आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीला कदापी मतदान करणार नाही'

'शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही असे म्हणत असले तरी त्यांचं काही चुकलं नाही.'
'शिवसेनेचा खरा आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीला कदापी मतदान करणार नाही'
ShivsenaSaam TV

नागपूर : आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयासाठी निवडणूक लढवत आहोत, विचारपूर्वक राज्यसभेत (RajyaSabha) तीन उमेदवार दिले आणि आमदारांच्या सद्सद्विवेक बुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. त्याप्रमाणे विधान परिषदेतही आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केलेला नाही तर, अतिशय नियोजनपूर्वक आम्ही या निवडणुकीची तयारी केली असून आम्ही विजय होणार असंल्याचा आम्हाला विश्वास आहे असं वक्तव्य भाजपनेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलं आहे.

ते पुढे म्हणाले, २४ ऑक्टोबर २०१९ रोजी आमच्याशी धोका झाला. मतदारांशी गद्दारी केली, आता जसं कर्म केलं तसंच फळ देणार, ज्यांनी मतदारांशी विश्वासघात केला, गद्दारी केली, आता तेच लोक आमदारांबाबत (MLA) गद्दारी आणि धोका केल्याच्या गोष्टी सांगत आहेत. हे जगातील आठवा अजुबा आहे.

पाहा व्हिडीओ -

शिवाय आमदारांच्या सद्सद्विवेक बुद्धीला चोऱ्यामाऱ्या म्हणन, डॉक्टरपेक्षा कंपाउंडर मोठा म्हणन, पाप केल्याने कोरोना होतं असं म्हणन, भाजप जिंकली मात्र त्यांचा विजय झाला नाही असं म्हणणं, या सर्वाबद्दल हजारो वर्षांच्या संशोधनानंतर उत्तर सापडतील अशी टीका त्यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) केली.

तसंच शिवसेनेचे (Shivsena) आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मतदान करणार नाही असे म्हणत असले तरी त्यांचं काही चुकलं नाही. जनतेने त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिलं आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना माझं आवाहन आहे की त्यांनी १९६६ रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काय भाषण केले होते, ते एकदा ऐकावे. शिवसेनेचा खरा आमदार कदापी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू शकत नाही. ज्यांना खुर्चीचा प्रेम आहे, जे बाळासाहेबांचा विचार विसरले असतील ते मात्र मतदान करतील अशी खोचक टीता त्यांनी यावेळी केली.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com