Viral Video: पुण्यात भररस्त्यात दुचाकीने घेतला पेट; घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

दुचाकीने पेट घेतलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Pune News
Pune NewsSaam TV

पुणे : पुण्यातील (Pune) औंधरोड मार्गावर एक दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. दुचाकीने पेट घेतलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दुचाकीस्वाराने तत्परता दाखवत ही दुचाकी वेळीच रस्त्याच्या कडेला सोडल्याचं दिसतं आहे.

दरम्यान, आग लागलेली दुचाकी कोणाची आहे. याबबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र, भर रस्त्यात रहदारीच्या वेळी अचानक लागलेल्या दुचाकीमधून अचानक धूर आल्याने त्या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

पाहा व्हिडीओ -

ही आग ऐवढी भयानक होती की, काही कळायच्या आत दुचाकीने पेट घेतला शिवाय या आगीत ही दुचाकी जळून खाक झाली आहे. शिवाय ही दुचाकी पूर्णपणे जळाली असून आग कशामुळे लागली याचं कारणं समजू शकलेलं नाही. अंतर्गत भागातील शाॅर्टसर्किट झाल्याने दुचाकीने पेट घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. मात्र, ऐन रहदारीच्या वेळीच दुचाकीने पेट घेतल्याने परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com