Pune: दुचाकीवरून निघालेल्या प्राध्यापक महिलेला डंपरने चिरडले

वडगाव बुद्रुक येथील कॅनॉलजवळ भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली.
Pune Accidental News
Pune Accidental Newsसचिन जाधव

सचिन जाधव -

पुणे : पुण्यात (Pune) दुचाकीवरून कामावर निघालेल्या एका प्राध्यापक महिलेच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजता सिंहगड रोडवर घडली.

वृषाली तुषार थिटे असं मयत प्राध्यापक महिलेचे नाव आहे. या अपघातानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, वृषाली थिटे या नऱ्हे (Narhe) मध्ये असणाऱ्या झील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.

नेहमीप्रमाणे आज सकाळी कामावर दुचाकीवरून निघाल्या असता. वडगाव बुद्रुक येथील कॅनॉल शेजारी असलेल्या शिंदे मैदानाजवळ त्या आल्या यावेळी भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. या धडकेमुळे त्या खाली पडून चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर (Accident) डंपरचालक फरार झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com