Pune: पूर्ववैमनस्यातून कोंढव्यात तरुणाची कोयत्याने सपासप वार करत हत्या

गुजर आणि 'त्या' तरुणात या कारणातून अनेकदा भांडणे झाली होती. त्यातूनच हा खून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
kondhwa Crime News
kondhwa Crime NewsSaam TV

सचिन जाधव -

पुणे : पुण्यात (Pune) काल रात्री किरकोळ कारणावरून एका तरुणाची निर्घृन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी मित्रा-मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. सदर घटना भगवा चौक शिवनेरी नगर गल्ली क्रमांक १२ या ठिकाणी घडली असून महेश गुजर वय २४ असं हत्या झालेल्या तरुणाचं नावं आहे.

पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील महिन्यात पुण्यातील नाना पेठेत २८ वर्षाच्या तरुणाची डोक्यात सिमेंटचे ब्लॉक घालून हत्या करण्यात आली होती. अशातच आता काल रात्री कोंढवा परिसरात चौघांनी मिळून एका युवकाची हत्या केली असून या घटनेनं कोंढवा (kondhwa) परिसर हादरुन गेला आहे. पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांचा या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवरती काही धाक उरलाय का नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

पाहा व्हिडीओ -

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, गुजर हा दुचाकीवरून रस्त्याने निघाला होता. त्यावेळी कोंढव्यातील भगवा चौक परिसरात दोघांनी त्याला अडवले. त्यातील एकाने गुजर याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हल्यात गंभीर जखमी झाल्याने गुजर याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिस ठाण्याचे (Kondhwa Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गुजर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसून आला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

kondhwa Crime News
Maharashtra Politics : शिवसेना नेमकी कुणाची? राज्यातील सत्तासंघर्षावर आज 'सुप्रीम' सुनावणी

दरम्यान, शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात (Hospital) पाठवण्यात आला होता. राज पवार आणि त्याच्या साथीदारांनी गुजर याचा खून केल्याचा संशय आहे. गुजर याच्या बहिणीची एका तरुणासोबत मैत्री होती. पवार हा त्या तरुणाचा मित्र आहे. गुजर आणि त्या तरुणात या कारणातून अनेकदा भांडणे झाली होती.

त्यातूनच हा खून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तर चार आरोपींना पोलिसांनी अटक देखील करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com