
रुपाली बडवे
मुंबई : ज्या दिवशी पहिल्या आदिवासी राष्ट्रपतींचे (President) स्वागत करण्यात आले, त्याच दिवशी एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने पर्यावरणवाद्यांना ताब्यात घेतले आणि आरे जंगलातील काही भागांमध्ये प्रवेश रोखला. सार्वजनिक सुरक्षेसाठी विविध कामे केली जात आहेत, या नावाखाली नागरिकांना आरे जंगलात (Aarey forest) जाण्यापासून रोखण्यात आले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. बाब अत्यंत निंदनीय असून आम्ही त्याचा निषेध करतो, अशी टिका आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) मुंबईचे कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास यांनी केली.
आजच्या कृतीतून मुंबई महानगपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यातील साखळी कायम आहे, हे सिद्ध होते.पालिकेने केलेले कोणतेही काम सार्वजनिक क्षेत्रात असते आणि ते छाननीसाठी खुले असते. कोणत्या आधारावर त्यांना प्रवेश नाकारला जात आहे आणि त्यांना ताब्यात घेतले जात आहे? असा सवाल रुबेन मस्करेन्हास यांनी उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुंबईकरांविरुद्ध बळाचा आणि धमकावण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आणीबाणीसारखी परिस्थिती किती लवकर आणली. हे अत्यंत धक्कादायक आहे. एम.एम.आर.सी आणि मुंबई महानगरपालिकेच्या कामाच्या नावाखाली नागरिकांना प्रवेश नाकारला जात आहे आणि ताब्यात घेतले जात आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी दिली आहे.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.