'सेना- भाजपची नळावरची भांडणं, 'मविआ' ची चाक झाली खिळखिळी; 'आप' सक्षम'

स्वतःचं अपयश झाकण्यासाठी मविआचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे असेही धनंजय शिंदे यांनी म्हटलं.
dhananjay shinde
dhananjay shindesaam tv

डोंबिवली : शिवसेना (shivsena) आणि भाजप (bjp) हे दाेन्ही पक्ष २७ वर्ष एकत्र नांदले. आता त्यांची सुरु झालेली भांडणं ही नळावरची आहेत. या भांडणांमध्ये विशेषत: डोंबाऱ्याच्या खेळांत जनतेला काेणताच रस नाही असे मत आम आदमी पार्टीचे (aap) महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी येथे व्यक्त केले. (aap maharashtra latest marathi news)

श्री. शिंदे हे आज डोंबिवलीत (dombivali) येथे आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना भाजपवर टीका केली. यावेळी आपचे दीपक दुबे, धनंजय जोगदंड, अक्षरा पटेल, अवधूत दीक्षित, चिराग हरिया आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

dhananjay shinde
Maharashtra: 'केसेस घ्यायला, दोन हात करायला तयार व्हा, आता सोडायचं नाही'

शिंदे म्हणाले महापालिकेने कोविड काळात काम केलेल्या २५० हुन अधिक कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. या निर्णया विराेधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहाेत. सुमारे एक लाख नागरिकांच्या सहयांची मोहीम हाती घेणार आहाेत. त्यातून कामगारांना न्याय मिळेल अशी आशा आहे.

ही तर नळावरची भांडणं

शिवसेना आणि भाजपात सध्या सुरु असलेल्या कलगीतु-यावर शिंदे म्हणाले आमचे राजकारण फक्त आणि फक्त जगण्याच्या प्रश्नांच्या संदर्भात असेल. रोटी, कपडा आणि मकान, वीज, आरोग्य, पाणी, शिक्षण याच मुद्द्यांवर आम आदमी पक्ष राजकारण करेल. कालही तेच केलं आज ही तेच करीत आहाेत आणि या पूढेही जनतेच्या जगण्याच्या प्रश्नांवरती राजकारण करणार आहाेत. सेना - भाजप हे दोन्ही पक्ष २७ वर्ष एकत्र नांदले, आता त्यांची नळावरची भांडणे सुरु आहेत. महागाईने होरपळलेल्या, बेरोजगारीने होरपळलेल्या आणि कोविडमुळे स्वतःच्या घराचं अर्थकारण कोलमडून पडलेल्या जनतेला या अशा डोंबाऱ्याच्या खेळात काहीच रस नाहीये. सर्वसामान्यांना आता दिलासा पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली पाहिजे यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहाेत.

'मविआ' ची तिन्ही चाक खिळखिळी

महाविकास आघाडी तीन चाकांचे सरकार आहे. त्यातल एक चाक पंक्चर झाले आहे. एका चाकाचे व्हील फिट नाहीये आणि तिसऱ्यात हवा कमी आहे. त्यामुळेच गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित रित्या कारभार करीत नाहीये. दिल्लीत आम आदमी पक्षासारखा पक्ष १ जुलै पासून ३०० युनिट फ्री देताेय. तेथे जादा वीज आहे. शिवसेनेने सन २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी त्यांच्या जाहीरनाम्यात ३०० युनिट पर्यन्त जे बिल आहे त्यातील ३० टक्के सवलत देणार आहोत असे सांगितले हाेते. परंतु केले काहीच नाही.

...तर लोडशेडिंगची गरज पडली नसती

सगळं खापर केंद्र सरकारवर फाेडणे याेग्य नाही. कोळसा उपलब्ध नाही कोळसा आणण्यासाठी वाघिने नाहीये. हे स्वतःचं अपयश झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहे. इच्छाशक्ती असेल यांनी मविआने व्यवस्थित नियोजन केलं असते तर खरच लोडशेडिंगची गरज पडली नसती असे ही धनंजय शिंदे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

dhananjay shinde
Mulund: २४ तास पाेलीसांना सुटी द्या, मग बघा! राणेंचा ठाकरेंना इशारा
dhananjay shinde
Satara: मामाच्या गावास आलेल्या तारळेतील मुलाचा डोंगरावरुन पडून मृत्यू
dhananjay shinde
कांडलीत गॅस सिलेंडरच्या गाेदामात स्फाेट; मूलगी जखमी, परिस्थिती नियंत्रणात

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com