Aapla Dawakhana: राज्यात सुरु झालेला 'आपला दवाखाना' नेमका आहे तरी काय?, कोणत्या आजारांवर मिळणार उपचार; वाचा सविस्तर

Latest News: मुंबई आणि उपनगरांसह राज्यभरात 317 ठिकाणी हा दवाखाना सुरु करण्यात आला आहे.
Aapla Dawakhana
Aapla DawakhanaSaam Tv

अभिजित देशमुख, कल्याण

Mumbai News: महाराष्ट्र दिनाचे (Maharashtra Day) औचित्य साधत सरकारने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आपला दवाखाना (Aapla Dawakhana) राज्यभर सुरु केला. मुंबई आणि उपनगरांसह राज्यभरात 317 ठिकाणी हा दवाखाना सुरु करण्यात आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते या दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. या आपल्या दवाखान्यात नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहेत. हा आपला दवाखाना नेमका आहे तरी काय आणि या दवाखान्यामध्ये नेमक्या कोण-कोणत्या आजारांवर उपचार मिळणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत...

Aapla Dawakhana
Bihar Muzaffarpur News: अख्ख्या कुटूंबावर आली काळ रात्र! झोपेत असतानाच घराला भीषण आग, चार मुलींचा होरपळून मृत्यू

आपला दवाखाना आहे तरी काय?

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' मार्फत शहरातील नागरिकांना मोफत उपचार आणि विविध आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सदृढ रहावे आणि नागरिकांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने आपला दवाखाना राज्यभर सुरू करण्यात आले आहेत. आपला दवाखान्यामध्ये रुग्णांवर मोफत उपचार मिळणार आहेत.

आपल्या दवाखान्यामध्ये बाहयरुग्ण विभाग असणार आहे. तसेच असांसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण, माताबाल संगोपन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच बाहयसंस्थेद्वारे रक्त आणि लघवीच्या तपासण्या करण्यात येणार आहे. या दवाखान्यामुळे जवळच्या परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Aapla Dawakhana
Rahul Gandhi News: मोठी बातमी! 'मोदी आडनाव' बदनामी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

या आजारांवर मिळणार उपचार -

आपला दवाखान्यात जनरल ओपीडी असणार आहे. रक्तदाब, मधुमेह, जनरल ओपिडी, माता बाल संगोपन, सर्व प्रकारचे लसीकरण, ताप, मलेरिया, डेंग्यू इत्यादी साथीच्या रोगांवर उपचार मिळणार आहेत. त्यासोबतच मोफत रक्त आणि लघवी तपासणी करता येणार आहे. आवश्यकता असल्यास तज्ञ डॉक्टरांचे टेलिकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.

Aapla Dawakhana
Sharad Pawar Retirement: 'राजीनाम्याचं आधीच ठरलं होतं, कालच घोषणा करणार होते; पण...; अजित पवारांचा मोठा खुलासा

आपला दवाखान्याची वेळ काय?

महापालिकेच्या रुग्णालयात ओपीडी सेवा सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उपलब्ध असते. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांना उपचार घेणं शक्य होत नाही. ज्या कामगारांना, मजुरांना कामाच्या वेळेत औषधोपचारासाठी दवाखान्यात जाणं शक्य होत नाही त्यांच्या कामाच्या वेळेनंतरही त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून या ‘आपला दवाखान्या’ची  वेळ दुपारी  2 पासून रात्री 10 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com