Aarey Car Shed: मेट्रोच्या बांधकामाला विरोध करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

आंदोलकांवर काम सुरू असलेल्या ठिकाणचे फोटो काढत, सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करून धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Aarey Car Shed News
Aarey Car Shed NewsSaam TV

मुंबई : मुंबईतील (Mumbai) आरे येथील मेट्रोच्या बांधकामाला विरोध करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तबरेज कमरअली शेख, धवल दिलीप नावा, एलायजा इमॅनियल ख्रिस व अनोळखी पाच जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेला मुंबईतील आरे येथील मेट्रो कारशेड प्रकल्प या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) आरे येथील कारशेडचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेड कामावर बंदी घातली होती. मात्र, राज्यात सत्तांतर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामावर बंदी उठवली.

त्यामुळे कारशेड आरे येथे होणार असल्याचं स्पष्ट झालं असून लवकरच कारशेडचे काम पुन्हा सुरु करण्यात येत आहे. मात्र, या कामाला माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. यासाठी अनेक जण रस्त्यावर देखील उतरले आहेत.

दरम्यान, काही आंदोलक आरे कारशेड मेट्रो 3 या परिक्षेत्रात प्रवेश करत, मुंबई मेट्रो कारशेडच्या कामास विरोध केला. तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणचे फोटो काढत गैरकायद्याची मंडळी जमवुन सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करून धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

तर काही आरोपींनी दगडफेक करून इतरांच्या जिवितास धोका पोहचेल असे कृत्यकरून विनापरवाना प्रवेश केल्याने आरे पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात कलम 452, 336, 143, 147, 149, 323, 506 भारतीय दंड संहिता 1860 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com