Pune: शाळेच्या गेटवरुन १४ वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण; आंबेगावमधील धक्कादायक घटना

मुख्याद्यापकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन मंचर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune News
Pune Newsरोहिदास गाडगे

पुणे: आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) पेठ येथील शासकिय निवासी आश्रम शाळेतील १४ वर्षीय विद्यार्थांला आमिश दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय निवासी शाळेच्या मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीवरुन मंचर पोलीसांत (Manchar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ तारखेला सकाळी ८.३० च्या सुमारास आंबेगाव येथील शासकीय निवासी शाळेच्या गेट बाहेर एका अज्ञात व्यक्तीने महेंद्र उघडे या १४ वर्षीय विद्यार्थ्याला आमिश दाखवून त्याचं अपहरण केलं.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, महेंद्रचं अपहरण झाल्याचं लक्षात येताच शाळेच्या मुख्याद्यापकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन मंचर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकिय निवासी आश्रम शाळेतील मुलं जर अशा पद्धतीने बेपत्ता होत असतील तर मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहत आहे.

शिवाय शाळेतून मुलं अशी बेपत्ता होत असतील तर, आम्ही या शाळेमध्ये मुलांना का पाठवायचं असा सवाल पालक उपस्थित करत आहेत. तर या प्रकरणाचा सदर गुन्हयाचा पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com