झोपडपट्टीवासीयांसाठी मोठी बातमी! झोपडपट्टी विकासाला येणार गती

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन माहिती दिली .
झोपडपट्टीवासीयांसाठी मोठी बातमी! झोपडपट्टी विकासाला येणार गती
jitendra awhad saam tv

मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी विकासाला आता गती येणार आहे. मुंबईतील (Mumbai) ५१७ प्रकल्पांना ५ वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे, ज्यामध्ये कोणतीही कामे झालेले नाही, अशा प्रकल्पांना रद्दबातल ठरविण्यात येणार आहे. याची नवीन प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करुन दिली आहे.

या सर्व प्रकल्पांना अभय योजना लागू होणार आहे. या योजनेचे अनेक फायदे होणार आहेत. या योजनेचा मुंबईतील ५०००० कुटुंबांना फायदा होणार आहे. या योजनेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मान्यता दिली असल्याचे आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

''मुंबईत राहणाऱ्या झोपडपट्टी वासीयांसाठी खुशखबर ! ज्या 517 प्रकल्पांना 5 वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे आणि ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही. अशा प्रकल्पांना रद्दबातल ठरविण्यात येत आहे. याची नवीन प्रक्रिया सुरु होईल. त्याचबरोबर ह्या सगळ्या प्रकल्पांना अभय योजना देखील लागू होईल. अभय योजनेचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे झोपडपट्टी विकासाला प्रचंड गती येईल. ह्या योजनेचा मुंबईतील 50000 कुटुंबाना फायदा होईल मा. मुख्यमंत्री महोदयांनी सदर अभय योजनेला मान्यता दिली. गोरगरीब झोपडपट्टी वासियांच्या हितांचे रक्षणसाठी ही क्रांतिकारी योजना आघाडी सरकारनी आणली आहे. ही योजना छत्रपती शाहू ह्यांच्या स्मृतींना अभिवादन करून जाहीर करतो.'' असं ट्विट जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.