आईवडिलांची हत्या करून, इंग्रजी भाषेच्या जोरावर आरोपी तीन वर्ष फरार!

नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने ३ वर्षानंतर एका हत्येच्या गुन्ह्याची उकल आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी आपल्या आईवडिलांवर हल्ला करत आईची हत्त्या करून करून पसार झाला होता.
आईवडिलांची हत्या करून, इंग्रजी भाषेच्या जोरावर आरोपी तीन वर्ष फरार!
आईवडिलांची हत्या करून, इंग्रजी भाषेच्या जोरावर आरोपी तीन वर्ष फरार!चेतन इंगळे

चेतन इंगळे

वसई/विरार : नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने ३ वर्षानंतर एका हत्येच्या गुन्ह्याची उकल आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी आपल्या आईवडिलांवर हल्ला करत आईची हत्त्या करून करून पसार झाला होता. तब्बल ३ वर्षांनी पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क परिसरात राहणाऱ्या जन्मेश पवार या आरोपीने शेअर मार्केट मध्ये तीन वर्षांपूर्वी पैसे गुंतवले होते त्यात त्याला मोठे नुकसान झाले. यामुळे त्याचे वडील आणि त्याचात खडके उडायला लागले. वडिलांवरील रागाच्या भरात २९ फेब्रुवारी २०१९ रोजी आईवडील झोपले असताना त्यांच्यावर चाकूने आणि स्क्रूड्रायव्हर ने हल्ला केला. त्यात वडील गंभीर जखमी झाले तर आई जागीच ठार झाली.

हे देखील पहा :

या नंतर तो फरार झाला होता. जन्मेशच्या वडिलांनी त्याच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीस मागील तीन वर्षापासून त्याचा शोध घेत होते. पण तो पोलिसांच्या हाती सापडत नव्हता. शेवटी एका गुप्त बातमीदाराच्या मदतीने पश्चिम बंगाल मधून याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी माहिती दिली की, जन्मेश हा उच्च शिक्षित असल्याने त्याचे इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. यामुळे त्याला हॉटेल, मॉल या ठिकाणी सहज नोकरी मिळत असे. तो एका ठिकाणी केवळ सहा महिने काम करत असे. त्याला तंत्रज्ञान आणि माहिती विषयातील चांगली माहिती असल्याने त्याने कधीच स्मार्ट फोन वा समाज माध्यमांचा वापर केला नाही.

आईवडिलांची हत्या करून, इंग्रजी भाषेच्या जोरावर आरोपी तीन वर्ष फरार!
Rain : अबब..! चंद्रपुरात पावसासोबत पडला फेस

यामुळे त्याचे ठिकाण माहित पडत नव्हते. त्याने आतापर्यंत गुजरात, नोयडा, बनारस, तसेच नेपाळ आणि बांगलादेशात सुद्धा वाऱ्या केल्या आहेत. आपल्या इंग्रजीच्या प्रभूत्वावर तो समोरच्या व्यक्तीवर छाप पाडत असे. यामुळे तो कुठेही आपला ठिकाणा तयार करत असे. पोलिसांनी सर्व गुप्त माहितीदारांना सक्रीय करून त्याची माहिती मिळवली. तेव्हा तो बंगाल मधील एका मॉल मध्ये काम करत असल्याचे त्यांना समजले. पोलीसांनी सापळा रचून त्याला अटक केल्याची माहित साहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com