
Abu Asim Azmi Threats News : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबु असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आझमींच्या स्वीय सहायकाला हा धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
अबु असीम आझमी (Abu Asim Azmi) हे समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत. औरंगजेबाला पाठिंबा दिल्याबद्दल आझमींना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणारा फोन त्यांच्या स्वीय सहायकाला आला होता.
आझमींच्या पीएला फोन करून अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या प्रकरणात मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी (Colaba Police) अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ५०६ (२) आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अबु आझमींना याआधीही जीवे मारण्याची धमकी आली होती. जुलै २०२२ मध्ये आझमींच्या स्वीय सहायकानेच पोलिसांत तक्रार नोंदवली होती. आझमींच्या पक्षाने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध केला होता, त्यामुळे त्यांना फोनवरून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.