बदलापुरातून एसी लोकल पुन्हा सुरू होणार?

साधी लोकल रद्द करून एसी लोकल नकोच; प्रवासी आपल्या मागणीवर अजूनही ठाम
Ac Local
Ac Local Saam Tv

बदलापूर - रेल्वे प्रवाशांनी विरोध केल्यानंतर बंद करण्यात आलेली एसी लोकल पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेनं तशी लेखी सूचना बदलापूर स्थानकात लावली असून एसी लोकलबाबत प्रवाशांच्या सूचना मागवल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात एसी लोकल सुरू केल्या होत्या. मात्र सध्या लोकल रद्द करून त्याजागी या लोकल चालवण्यात येत असल्यानं प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानकात सलग तीन दिवस आंदोलन करत स्टेशन मास्तरांना घेराव घातला होता.

हे देखील पाहा -

त्यामुळं रेल्वे प्रशासनानं नमतं घेत २४ ऑगस्ट रोजी एसी लोकल रद्द करून पुन्हा साधी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण या गोष्टीला १७ दिवस उलटल्यानंतर रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात एक सूचना लावली आहे. ज्यामध्ये रेल्वे प्रशासनाला पुन्हा एसी लोकल सुरू करण्याची इच्छा असून याबाबत प्रवाशांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर पसरला आहे.

मुळातच एसी लोकल सुरू करायला आमचा विरोध नसून आमची साधी लोकल रद्द करून त्याजागी एसी लोकल सुरू करायला आमचा विरोध असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. तसंच बदलापूर रेल्वे स्थानकात अनेकदा दोन लोकलमध्ये एक तास किंवा अर्ध्या तासाचं अंतर असतं.

Ac Local
Asia Cup 2022 : श्रीलंकेच्या 'त्या' षटकामुळे गेमच पालटला अन् पाकिस्तानचा गड ढासळला

या मधल्या वेळेत एसी लोकल सुरू करण्याची मागणी बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नरसाळे यांनी केली आहे. याबाबत रेल्वेला आमच्या सूचना सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आता एसी लोकल पुन्हा सुरू होणार का? आणि पुन्हा संघर्षाची वेळ येते का? याकडे प्रवाशांचं लक्ष लागलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com