Ulhasnagar News: उल्हासनगर महापालिका सहाय्यक आयुक्तासह एकास ACB ने घेतलं ताब्यात

Bribe Case: या कारवाईची चर्चा महापालिका कर्मचा-यांमध्ये दबक्या आवाजात सुरु हाेती.
ACB, Bribe, Ulhasnagar
ACB, Bribe, Ulhasnagar Saam Tv

Ulhasnagar : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तला लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. एसीबीने प्रभाग समितीचा बिट मुकादमास 20 हजार रुपये घेताना रंगेहाथ अटक केली आहे. हा बिट मुकादम सहाय्यक आयुक्तांचे कलेक्शन करीत असे. त्यामुळे ताे अडचणीत आला आहे. (Maharashtra News)

ACB, Bribe, Ulhasnagar
Viral Video : लाव्हा नव्हे पाण्याचा फवारा, पालकमंत्र्यांच्या घराजवळ जलवाहिनी फुटली; युवती जखमी (पाहा व्हिडिओ)

ठाणे लाच लुचपत विभागाने आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात लाच मागितल्याबद्दल दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात बीट मुकादम प्रकाश सकट याला रंगेहात लाच घेताना अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर मधील एक बांधकाम ठेकेदार अनिल करोतिया उर्फ चॉकलेट हे एक बांधकाम करत होते.

ACB, Bribe, Ulhasnagar
Holi Festival of Colours : 'होळी' त रंगाचे फुगे मारल्यास खावी लागणार तुरुंगाची हवा, नागपूरात चार हजार पाेलिस तैनात

हे बांधकाम उल्हासनगर महानगरपालिकेने दोन वेळा तोडले मात्र पुन्हा बांधकाम म्हणून करायचे असेल तर पन्नास रुपये लाच द्यावी लागेल, अशी मागणी प्रभाग कार्यालयाचे बिट मुकादम प्रकाश सकट आणि खाजगी चालक प्रदीप उमाप यांनी केली होती. त्यानंतर बांधकाम व्यवसायिकाने तक्रार केल्यानंतर प्रभाग समिती क्रमांक एकच्या कार्यालय बाहेरच बांधकाम व्यावसायिक अनिल करोतिया यांच्याकडून प्रकाश सकट यांनी वीस हजार रुपये लाच स्वीकारली.

तेव्हा लाचलुचपत विभागाने (acb) प्रकाश सकट याला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी नंतर बिट मुकादम सकट हा सहाय्यक आयुक्तांचे कलेक्शन करत असल्याचे समोर आल्यावर ,लाच लुचपत विभागाने सहाय्यक आयुक्त अजित गोवारी आणि खाजगी चालक प्रदीप उमाप यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com