भाजपमध्ये 'आयारामांचे' अच्छे दिन!

राज्यात सत्ता नसली तरीही केंद्राच्या आशीर्वादाने भाजपात आयारामांचे सध्या अच्छे दिन आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
भाजपमध्ये 'आयारामांचे' अच्छे दिन!
भाजपमध्ये 'आयारामांचे' अच्छे दिन! Saam TV

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: भाजपने विधान परिषदेसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून, मुंबईतून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 40 वर्ष काँग्रेसमध्ये असणाऱ्या सिंह यांनी 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांची थेट विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. मागील काही वर्षात वर्षात भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना अच्छे दिन आल्याचे पहायला मिळत आहेत. (acche din of outsiders leaders in BJP)

आतापर्यत भाजपने या आयारामांना  दिली संधी:

1) प्रवीण दरेकर - आधी परिषदेवर पाठवले आता ते विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आहेत

2) प्रसाद लाड - विधान परिषदेवर पाठवले

3) राजहंस सिंह - विधान परिषदेची उमेदवारी

4) चित्रा वाघ - भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारणीवर वर्णी

5) नारायण राणे - कॉंग्रेसमधून 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.  भाजपने आधी त्यांना राज्यसभेवर पाठवले आणि आता थेट केंद्रीय मंत्री आहेत.

6) भारती पवार - केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी (2019 मध्ये भाजप प्रवेश केला होता)

7) कपील पाटील  -  कपील पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून 2014 ला भाजपमध्ये प्रवेश केला होता, आता ते केंद्रात मंत्री आहेत.

भाजपमध्ये 'आयारामांचे' अच्छे दिन!
निलंबित एसटी कर्मचार्‍यांची संख्या २७७६ वर; कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम

एकुणच पाहता भाजपने सर्वच पक्षातून आलेल्या आयारामांना पक्षात एंन्ट्री दिली. २०१९ त्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीआधी तर भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाली होती, पण तरीही भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली नाही. मात्र वरील यादी पाहता राज्यात सत्ता नसली तरीही केंद्राच्या आशीर्वादाने भाजपात आयारामांचे सध्या अच्छे दिन आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com