Pune News : गुढीपाडव्याला गाडी धुवायला गेला अन् पिकअपसह विहिरीत पडला, नेमकं घडलं काय?

अग्निशमन जवानांनी सुमारे अर्धा तासात हे बचावकार्य पूर्ण केलं.
Pune News
Pune News Saam TV

सचिन जाधव

पुणे : पुण्यात एक पिक टेम्पो विहिरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. काञज-कोंढवा रस्ता, गोकुळ नगर, पुरंदर वॉशिंग सेंटरजवळ सकाळी ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाला घटनेचे माहिती मिळत ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमन जवानांनी पिकअपमधील एका व्यक्तीला सुखरुप विहिरीतून बाहेर काढलं.

अंदाजे ४० फुट खोल असलेल्या विहिरीमध्ये पडल्यानंतर पिकअपमधील व्यक्ती कडेला असणाऱ्या एका दोराला पकडून उभा होता. जवानांनी तत्परतेने मोठ्या रश्शीच्या साहाय्याने रिंग पाण्यात टाकून त्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढले. अग्निशमन जवानांनी सुमारे अर्धा तासात हे बचावकार्य पूर्ण केलं.  (Latest Marathi News)

Pune News
Osho Ashram Pune: मोठी बातमी! पुण्यातील ओशो आश्रमामध्ये मोठा वाद, जबरदस्तीने अनुयायी घुसले; पोलिसांचा लाठीमार

मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप टेम्पो मालक गुढीपाडव्यानिमित्त गाडी धुण्यासाठी वॉशिंग सेंटर येथे आला होता. चालक गाडीतून उतरून बाहेर जाताच विनोद पवार याने टेम्पोत बसून टेम्पोचा रिव्हर्स गियर टाकला आणि अचानक टेम्पोसह तो विहिरीत पडला. (Pune News)

Pune News
Mumbai Traffic Update: राज ठाकरेंच्या सभेमुळे मुंबईच्या वाहतूकीत होणार मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग अन् पार्किंग व्यवस्था

अचानक घडलेल्या प्रकारामुळे विहिरीत पडल्यानंतर गणेश भेदरलेल्या अवस्थेत विहिरीत ओक कोपऱ्यात दोरीला धरुन उभा होता. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गणेशचा जीव वाचला. पिक अप गाडी काढण्याचं काम देखील सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com