अपघात झाल्याचे समजताच नागरिकांची घटनास्थळी धाव; दारुच्या बाटल्या पळविल्या

पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे किरकाेळ अपघात घडत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
Accident, Baramati, Jejuri
Accident, Baramati, JejuriSaam tv

बारामती : बारामती (Baramati) जेजुरी (Jejuri) रस्त्यावर दारूच्या (Liquor) बाटल्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोंचा अपघात झाल्यानंतर बाटल्या गोळा करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. आज (शुक्रवार) सकाळी कडेपठार नजीक हा अपघात (accident) झाला. (baramati latest marathi news)

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी : आज सकाळपासून बारामती जेजुरी रस्त्यावर पाऊस पडत हाेता. याच मार्गावरील मावडी कडेपठार जवळ दारूच्या बाटल्या घेऊन जाणारा टेम्पो घसरून पलटी झाला. या टेम्पो मधील असलेल्या सर्व बाटल्या आणि बाॅक्स रस्त्यावर पडले.

Accident, Baramati, Jejuri
Ashadhi Wari 2022 : तुकोबारायांच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडीत उत्साहात संपन्न

या अपघाताची माहिती परिसरात समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दारूच्या बाटल्या उचलण्यासाठी एकच झुंबड उडाली. या ठिकाणी नुकतेच रस्त्याचे काम झाले आहे. काही अंतर डांबर प्रमाणापेक्षा जास्त टाकल्याने या ठिकाणी अपघात होत आहेत असे ग्रामस्थांनी सांगितले. काही दिवसापूर्वीच शिवशाही बसचा देखील अपघात झाला हाेता. ही बस घसरून रस्त्याच्या खाली गेली होती.

Edited By : Siddharth Latkar

Accident, Baramati, Jejuri
Neeraj Chopra : डायमंड लीग स्पर्धेत नीरज चाेप्राची उत्तंग कामगिरी (व्हिडिओ पाहा)
Accident, Baramati, Jejuri
Ashadhi Wari 2022 : राज्यात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या जीवनात उष:काल यावा : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
Accident, Baramati, Jejuri
गाेव्यात जल्लाेष; एकनाथ-लोकनाथ गाण्यावर थिरकले आमदार (व्हिडिओ पाहा)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com