Palghar Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, २ जण जखमी

Accident News : मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना वसई सतीवली बजरंग हॉटेलसमोर हा अपघात झाला आहे.
Accident News
Accident NewsSaam Tv

Palghar News :

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांना जागीच मृत्यू झाला आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना वसई सतीवली बजरंग हॉटेलसमोर हा अपघात झाला आहे. कार चालकाचा ताबा सुटला आणि त्यानंतर कार डिव्हायडर क्रॉस करून विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकवर धडकली.  (Latest News on Bharat)

Accident News
Girl Dies Due to Dengue : कल्याणमध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू, परिसरात भीतीचं वातावरण

या अपघातात चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी वसई पोलीस दाखल झाले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com