अंबरनाथ: रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू!

रविवारी रात्री पालेगाव परिसरात हा अपघात झाला.
अंबरनाथ: रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू!
अंबरनाथ: रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू!अजय दुधाणे

अजय दुधाणे

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये Ambarnath रिक्षा आणि कारच्या भीषण अपघात Accident चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री पालेगाव Palegaon परिसरात हा अपघात झाला.

हे देखील पहा-

या अपघातात एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वर्षा वलेचा (वय 51), आरती वलेचा (वय 41) आणि राज वलेचा (वय 12) या तिघांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. या परिवारातील एक जखमी झाला तर रिक्षाचालक Auto Rickshaw Driver किसन शिंदे यांनाही या भीषण अपघातात प्राण गमवावे आहेत.

अंबरनाथ: रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू!
सांगली: बहरलेल्या 'मिनी कास पठार'ची पर्यटकांना भुरळ

पालेगाव भागातील नवीन प्लॉटिंग झालेल्या एमआयडीसी भागातील रस्त्यावर हा अपघात झाला. अपघातानंतर सर्वांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांनी चौघांना मृत घोषित केलं. दरम्यान, हा अपघात कसा झाला, याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com