भयंकर! दारु पिण्यासाठी पाणी दिलं नाही, तरुणावर केले धारधार शस्त्राने वार, आरोपी गजाआड

उल्हासनगर येथील गोल मैदानात धक्कादायक घटना घडली आहे.
ulhasnagar crime news
ulhasnagar crime newsSaam Tv

उल्हासनगर : येथील गोल मैदानात धक्कादायक घटना घडली आहे. दारु पिण्यासाठी पाणी दिलं नाही म्हणून एका व्यक्तीवर (ulhasnagar crime) धारधार शस्त्राने वार केल्याची घटना घडलीय. राजू जोगदंडे असं गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जोगदंडे यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना उल्हासनगरच्या गोल मैदानात घडली असून (culprit arrested) याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात (police) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी गोकुळला पोलिसांनी अटक केली आहे.

ulhasnagar crime news
India's tour of Zimbabwe : झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

मिळालेल्या माहितीनुसार, राजू शुक्रवारी रात्री गोलमैदान परिसरात दारू पिण्यासाठी बसला होता. त्याठिकाणी त्याचा ओळखीचा गोकुळ नावाचा तरुण आला. गोकुळने राजूकडे दारु पिण्यासाठी पाणी मागितलं. परंतु राजूने पाणी देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर गोकुळने राजूवर धारधार शस्त्राने वार केले.

ulhasnagar crime news
Mumbai Crime News | महिलेला २० व्या मजल्यावरून खाली फेकलं; मुंबईतील धक्कादायक घटना

या हल्ल्यात राजू गंभीर जखमी झाला. याप्रकरणी आरोपी गोकुळला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, उल्हासनगरच्या गोलमैदान परिसरात नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी रात्रीच्या वेळी गस्त घालून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालावा, अशी मागणी नागरिक करत आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com