बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दागिने केले पसार; आरोपीस २४ तासांत अटक

कुर्ल्याच्या सीएसटी रोड, आंबेडकर नगर, राजू बडेकर मार्ग येथे एका महिलेची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. साधूच्या वेशात आलेल्या एका इसमाने महिलेला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने तिचे दागिने लंपास कंले.
बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दागिने केले पसार; आरोपीस २४ तासांत अटक
बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दागिने केले पसार; आरोपीस २४ तासांत अटकसुरज सावंत

मंबई - कुर्ल्याच्या kurla सीएसटी रोड, cst road आंबेडकर नगर, ambedkar nagar राजू बडेकर मार्ग raju badekar marg येथे एका महिलेची फसवणूक fraud with women झाल्याची घटना घडली आहे. साधूच्या वेशात आलेल्या एका इसमाने महिलेला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने तिचे दागिने लंपास कंले. ही महिला तिच्या मुलासह घरी असताना फकीर बाबा बनून आलेल्या एक अनोळखी व्यक्ती unknown person त्यांच्या घराच्या दरवाजात आला. त्याने सांगितलं की, तुमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी असतं, तुमची इडा - पीडा जावी याकरिता तुम्ही तुमच्याकडील असलेले सोने मला काढून दया, मी त्यावर उपाय करतो असे सांगून हातचलाखीने मनी मंगळसूत्र, अंगठी, कानातले असे एकूण 36 ग्रॅम वजनाचे दागिने jewellery काढून घेतले आणि पसारा झाला.

हे देखील पहा -

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विभा नगर पोलीस ठाणे अंतर्गत भा द वि ipc कलम 420 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस तपासात आरोपीबाबत माहिती घेण्यात आली. त्यावेळी आरोपी बजरंग व्यंकटराव भांडे याला मिळालेल्या माहितीच्या आधारे ताब्यात फसवणूक करणाऱ्या आरोपीस 24 तासांच्या आत विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांचा धाक पाहिल्यानंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबूली दिली. या आरोपीवर इतर गुन्ह्यांची नोंद आहे का हे पोलिस पडताळत आहेत.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com