Dombivli Auto Rickshaw Drivers | डोंबिवलीत मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई...

Dombivli Auto Rickshaw Drivers: डोंबिवली वाहतूक विभाग व उप-प्रादेशिक परिवहन विभागाने (Traffic Police) संयुक्त कारवाई सुरू केली आहे.
Dombivli Auto Rickshaw Drivers | डोंबिवलीत मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई...
Action against auto rickshaw drivers in Dombivli by traffic policeप्रदीप भणगे

डोंबिवली: डोंबिवलीतील रिक्षावाले त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाश्यांचे नेहमीच भांडण होताना दिसत असते. त्यामुळे मुजोर रिक्षा चालकांवर (Auto Driver) कारवाई करावी अशी मागणी डोंबिवलीमधील (Dombivali) प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात होती. आता या मागणीला दाद देत डोंबिवली वाहतूक विभाग व उप-प्रादेशिक परिवहन विभागाने (Traffic Police) संयुक्त कारवाई सुरू केली आहे. विना गणवेश, विना परवाना, स्टँड सोडून प्रवासी वाहतूक करणे, प्रवाशांकडून वाढीव भाडे घेणे, बेशिस्तपणे प्रवाशांशी वागणाऱ्या डोंबिवलीतील ५५  मुजोर रिक्षा चालकावर डोंबिवली वाहतूक विभाग व उप-प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. दरम्यान ही कारवाई किती दिवस चालते की फक्त दिखावा कारवाई राहते हे पहावे लागेल. (Action against bad auto rickshaw drivers in Dombivli by traffic police)

हे देखील पहा -

सोमवारपासूनच डोंबिवलीत एका रिक्षात दोनच प्रवासी या विषयावरून प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये भांडणे सुरू झाली आहेत. गेल्या वर्षी जूनपासून रिक्षा चालकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी एका रिक्षेत दोन प्रवासी घेऊन प्रति प्रवासी २० रुपये भाडे घेण्यास सुरुवात केली होती. प्रवाशांनी २० रुपये भाडे अनेक महिने दिले. रिक्षा चालकांना एक फेरीत ४० रुपये मिळत असल्याने चालक खूष होते. करोना निर्बंध उठल्यानंतरही रिक्षा चालकांनी तीन प्रवासी आणि शेअर भाडे घ्यावे म्हणून प्रवासी प्रयत्नशील होते. त्याला रिक्षा चालक दाद देत नव्हते. तसेच दोन दिवसांपूर्वी शासनाचे कठोर निर्बंध लागू झाल्या बरोबर डोंबिवलीतील एका रिक्षा संघटनेने त्याच्या सदस्यांना करोनाचा वाढता धोका विचारात घेऊन रिक्षात दोन प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करण्याच्या सूचना केल्या. तसेच डोंबिवली पूर्व, पश्चिमेत काही रिक्षा वाहनतळांवर चालक मनमानी करून दोन प्रवासी घेऊन आणि प्रत्येकी 20 रुपये भाडे घेऊन वाहतूक करत आहेत. त्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाश्यांना नेहमीच भांडण होताना दिसत असतात. त्यामुळे मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करावी अशी मागणी डोंबिवलीमधील प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात होती.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व डोंबिवली वाहतूक विभाग यांनी संयुक्तपणे डोंबिवली पश्चिम येथे दुपारी व संध्याकाळी असे दोन सत्रात वाहतूक नियम मोडणारे एकूण ५५ रिक्षा चालकांवर धडक कारवाई करण्यात आली आणि १,३७,००० रुपये दंड आकारण्यात आला आहे. बेशिस्त रिक्षा चालकांवर ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.

उमेश गित्ते, वाहतूक पोलीस निरीक्षक डोंबिवली

Action against auto rickshaw drivers in Dombivli by traffic police
कल्याण ग्रामीण भागात दारू माफियांचे 9 लाखांचे नवसागर मिश्रित रसायन नष्ट

असं असतानाच आता रिक्षा चालकांच्या मनमानी काराभारावर अंकुश आणण्यासाठी पोलीस पुढे सरसावले आहेत. गुरुवारी सकाळपासूनच रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. विना गणवेश, विना परवाना, स्टँड सोडून प्रवासी वाहतूक करणे, प्रवाशांकडून वाढीव भाडे घेणे, बेशिस्तपणे प्रवाशांशी वागणाऱ्या डोंबिवली मधील ५५ मुजोर रिक्षा चालकावर डोंबिवली वाहतूक विभाग व उप-प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त कारवाई केली आहे आणि त्यांना १ लाख ३७ रुपये दंड करण्यात आला आहे. दरम्यान ही कारवाई किती दिवस चालते की फक्त दिखावा कारवाई राहते हे पहावे लागेल.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.