Pune News: ऑडिटरचे पैसे द्यायला वर्गणीद्वारे लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई, पुण्यातील प्रकार

लोकसेवक पर्यवेक्षिका विद्या सोनवणे यांनी ४,००० रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्वीकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
Bribe Satara News
Bribe Satara NewsSaam tv

>> सचिन जाधव

पुणे : पुण्यातील भोर येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प येथे पर्यवेक्षिकेवर लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई करण्यात आहे. त्याच कार्यालयात काम करणाऱ्या पर्यवेक्षिकेच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार व लोकसेवक पर्यवेक्षिका विद्या सोनवणे ह्या भोर येथे एकाच कार्यालयात काम करत आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या झालेल्या ऑडीटच्या अनुषंगाने ऑडीटर यांना देण्यासाठी पर्यवेक्षिका सोनवणे यांनी ४,००० रुपयांची लाच मागितली. (Latest Marathi News)

Bribe Satara News
Pune : पुण्यात अग्नितांडव! मंगळवार पेठेत दुकांनाना मोठी आग; 8 अग्निबंब घटनास्थळी

याप्रकरणी तक्रारदार यांनी लाच प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दिली. सदर तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवक पर्यवेक्षिका विद्या सोनवणे यांनी ४,००० रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्वीकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Bribe Satara News
Mumbai News : 'मुंबईच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी'; मोदींच्या मुंबई दौऱ्याची 'सामना'त पानभरुन जाहिरात

याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, भोरमधील एकात्मिक एका बालविकास सेवा योजना येथे ऑडिटरला पैसे देण्यासाठी कार्यालयात वर्गणी काढण्यात आली होती. सोनवणे यांनी तक्रारदाराला तुझ्या वाटेला चार हजार रुपये आले आहेत, ते देण्याची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीला माहिती दिली. त्यावरून कारवाई करत याप्रकरणी भोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com