ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम तेजीत

मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्यानंतर फेरीवाल्यांविरोधात अधिकारी आक्रमक झाले आहेत.
ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम तेजीत
ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम तेजीतविकास काटे

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरु झाली असून प्रभाग समितीनिहाय कारवाईने आता चांगलाच वेग घेतला आहे. आज शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून हातगाड्या, टपऱ्या तसेच स्टॉल तोडण्यात आले.

हे देखील पहा -

या कारवाईतंर्गत नौपाडा - कोपरी प्रभाग समितीमधील ठाणे स्टेशन रोड, सॅटिस परिसर, गोखले रोड, हरिनिवास सर्कल, तीन हात पेट्रोल पंप, राम मारुती रोड आणि गावदेवी मंदिर परिसर या ठिकाणी असणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करत ४ हातगाड्या, २७ दुकानासमोरील वाढीव भाग तोडण्यात आला. तलाव पाळी, एसटी डेपो, अशोक सिनेमा, प्रभात सिनेमा, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका व गडकरी रंगायतन आदी ठिकाणांच्या ३ हातगाड्या व २२ दुकानासमोरील वाढीव भाग तोडण्यात आला.

ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम तेजीत
शासनाने ठरवून दिलेल्या नियमात राहून गणेशोत्सव साजरा करा : टोपे

यासोबतच कोपरीमधील नाखवा हायस्कूल, ठाणेकर वाडी, बारा बंगला, मंगला हायस्कूल तसेच रघुनाथ नगर, शाहिद मंगल पांडे सेवा रस्ता, आरटीओ ऑफिस व तीन हात नाका येथील ५ हातगाड्या व २३ दुकानासमोरील वाढीव भाग तोडण्यात आला. कळवा प्रभाग समितीमधील कळवा स्टेशन पूर्व, कळवा भाजी मार्केट, सहकार बाजार, कळवा नाका, खारेगाव मार्केट तसेच पारसिक ९० फूट रोड परिसर या ठिकाणी असणाऱ्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई करत त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com