कल्याण गुन्हे शाखेकडून कारवाई; रेकॉर्डवरील तडीपार गुंड जेरबंद !

कल्याण गुन्हे शाखेने (Kalyan Crime Branch) डोंबिवली पोलीस स्टेशनच्या (Dombivali Police Staion) रेकॉर्डवरील तडीपार खतरनाक नामचीन गुंडला जेरबंद केले आहे.
कल्याण गुन्हे शाखेकडून कारवाई; रेकॉर्डवरील तडीपार गुंड जेरबंद !
कल्याण गुन्हे शाखेकडून कारवाई; रेकॉर्डवरील तडीपार गुंड जेरबंद !Saam Tv

प्रदीप भणगे

डोंबिवली : कल्याण गुन्हे शाखेने (Kalyan Crime Branch) डोंबिवली पोलीस स्टेशनच्या (Dombivali Police Staion) रेकॉर्डवरील तडीपार खतरनाक नामचीन गुंड सनी जाधव (वय38) याला जेरबंद केले आहे. 30 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान डोंबिवली पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत तडीपार गुंड सनी परशुराम जाधव हा डोंबिवली पूर्वेतील ज्योती नगर झोपडपट्टी परिसरात येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.

हे देखील पहा-

झडप घालून पोलिसांनी पकडले;

गुप्त बातमीदारामार्फत पोलीस हवालदार दत्‍ताराम भोसले मुख्यालय ठाणे शहर यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखा (युनिट-3) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांना फोनद्वारे याबाबत माहिती दिली. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मोहन कळमकर, संजय माळी, वसंत बेलदार, सचिन वानखेडे, विश्वास माने यांचे पथक त्या ठिकाणी तात्काळ रवाना झाले. सदर ज्योतीनगर परिसरात पोलीस दबा धरून बसलेले असताना दिलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम दुर्गा माता मंदिरासमोर फिरत असताना दिसला. त्यास पकडण्यास जात असताना त्याला आरोपीला पोलिसांचा संशय आला आणि तो पळण्याच्या तयारीत असतानाच त्यास झडप घालून पोलिसांनी पकडले.

कल्याण गुन्हे शाखेकडून कारवाई; रेकॉर्डवरील तडीपार गुंड जेरबंद !
हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन; पठ्ठ्याचा बिनधास्त हवेत गोळीबार; पाहा Video

गुंड सनी हा नामचीन गुंड असून त्याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत आणि त्याची दहशत असल्याने त्यास मा. पोलिस उप आयुक्त,परिमंडळ -3 कल्याण यांचे आदेशान्वये 24 ऑगस्ट पासून ठाणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार (तडीपार) करण्यात आलेले आहे. असे असताना त्याने सदर आदेशाचा भंग केल्याने त्याच्यावर गुन्हे शाखा युनिट-3 कल्याण कडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम प्रमाणे कायदेशीर कारवाई करून पुढील तपासासाठी डोंबिवलीच्या पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com