'दगडफेक'मागील सुत्रधारावर कारवाई व्हायला पाहिजे : जयंत पाटील

आज शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करुन दगडफेक केली.
Jayant Patil
Jayant PatilSaam TV

मुंबई: मागिल काही महिन्यांपासून सुरु असलेलं एसटी (ST) कर्मचाऱ्यांचे आंदोलन काल संपले असतानाचा आज कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आंदोलकांनी दगडफेक केली आहे. यावेळी आंदोलकांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

'आदरणीय शरद पवार यांच्या घरावर आज काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. काल न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय ? आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते, असं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

Jayant Patil
Sharad Pawar : शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

'महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या शरद पवार यांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून, आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. पोलिसांनी (Police) या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज, शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

एसटी कर्मचाऱ्यांना मागे जाण्यासाठी पोलीस (Police) विनंती करत आहेत. पण कर्मचारी शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत आहेत. आम्हाला एसटी विलीनीकरण करायचे आहे. आमची मागणी तिच असल्याचे कर्मचारी सांगत होते.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक या ठिकाणी आंदोनात स्वत: खासदार सुप्रिया सुळे समोर आल्या आहेत. मी सगळ्या आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे. दगडफेक, चप्पल फेक करुन प्रश्न सुटणार नाही, चर्चा करुया तुम्ही सर्वांनी शांत रहा असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही आंदोलक कर्मचारी हे शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात घोषणा देत होते.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com