
ठाणे : अभिनेत्री केतकी चितळे हिला अॅट्रोसिटी प्रकरणातील केसमध्ये जामीन मंजूर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पावार (Sharad Pawar) यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी केतकी चितळे ही तुरुंगात होती. दरम्यान, आज केतकीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना ठाणे कोर्टाने २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.
मागील काही दिवसांपुर्वी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच राज्यभरात तिच्यावर जवळपास २० पेक्षा जास्त गुन्हे नोंद करण्यात आले होते. या सर्व गुन्ह्यांसदर्भात केतकीने आपल्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता.
हे देखील पाहा -
त्यामुळे आता केतकीला एका प्रकरणात जामीन अर्ज मंजूर झाला आहे तर दुसरीकडे राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ (State Director General of Police Rajneesh Seth) यांना केंद्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला तुरुंगात जावं लागलं होतं. आपल्याला पोलिसांनी केलेली ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत तिने हाय कोर्टात धाव घेतली होती. (Central Women's Commission)
याच प्रकरणाची आता केंद्रीय महिला आयोगाने दखल घेतली असून या आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना सात दिवसाच्या आत लेखी अहवाल सादर करण्याचे आयोगाचे निर्देश दिले आहे. तसंच याबाबत १७ जून रोजी होणाऱ्या सुनावणी दरम्यान पोलीस महासंचालकांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे महिला आयोगाचे निर्देश दिले आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.