भेटीगाठी आणि फोडाफोडी शिवाय मुख्यमंत्र्यांनी काहीही केलं नाही; AirBus प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

'खोके सरकारनं एकही उद्योग राज्यात ठेवला नाही, आपले मुख्यमंत्र्यांनी मंडळांना भेटी आणि फोडाफोडी सोडून काहीही केलं नाही.'
Aditya Thackeray Vs Eknath Shinde
Aditya Thackeray Vs Eknath ShindeSaam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : खोके सरकारनं एकही उद्योग राज्यात ठेवला नाही, आपले मुख्यमंत्र्यांनी मंडळांना भेटी, राजकीय गाटीभेटी आणि फोडाफोडी सोडून काहीही केलं नाही. अशी बोचरी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) केली आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली यावेळी त्यांनी अतीवृष्टीमुळे पुण्यात तुंबलेले पाणी, रस्त्यांवरील खड्डे अशा विविध प्रश्नांवरती चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपसह एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली.

पाहा व्हिडीओ -

आदित्य म्हणाले, या खोके सरकारने एकही उद्योग राज्यात ठेवला नाहीये. उद्योजकांचा या सरकारवर विश्वास नाही. आपले मुख्यमंत्र्यांनी मंडळांना भेटी, दहीहंडी, राजकीय भेटी आणि फोडाफोडी हे सोडून काही केल नाही. ते फोडोपोडी सोडून ते इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांप्रमाणे दुसऱ्या राज्यात गेले नाहीत. ते बाहेर गेले नाही तर राज्यात गुंतवणूक कशी आणणार? असा हल्लाबोल आदित्य यांनी यावेळी मुख्यमंत्र्यावर केला.

शिवाय या सरकारमधील कृषिमंत्री कोण आहे हेच शेतकऱ्यांना माहीत नाही. उद्योजकानां उद्योगमंत्री माहीत नाही या राज्यात चाललंय काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. शिवाय राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांचं तरी एक इंजिन फेल का होतंय? त्यापेक्षा तर केंद्रासोबत आमचं चांगलं चाललं होतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Aditya Thackeray Vs Eknath Shinde
Abdul Sattar : आदित्य ठाकरे म्हणजे 'छाेटा पप्पू', गाेधडीतून बाहेर आलेले आता बाेलू लागलेत : अब्दुल सत्तार

शहरात पाणी तुंबत आहे यावर काम व्हायला हवं. तसंच पुणे पालिकेतून इलेक्ट्रीत बससोबतच EV बाईक, शॉर्ट बस सुरु करण्याबाबत चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पाऊसामुळे पुण्यात जे पाणी तुंबलं आहे तो विषय गंभीर आहे.

पुण्यातील नद्यांचा विकास झाला पाहिजे, पर्यावरणवाद्यांना सोबत घेऊन काम व्हायला हवं. पर्यावरण आणि शहरीकरण यावर माझी कायम चर्चा होत असते पण शहरीकरणामुळे मी चिंतेत आहे. असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com