Mumbai Budget 2023: 'वर्षावरुन कंत्राटदारांनी बनवलेले बजेट...' मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
Aditya Thackeray on BMC Budget 2023
Aditya Thackeray on BMC Budget 2023Saam Tv

निवृत्ती बाबर...

Aditya Thackeray On BMC Budget 2023: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज (शनिवारी) सादर होणार झाले. मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी 2023-2024 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाचा अर्थसंकल्प 52 हजार 619 कोटींचा आहे.

हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे.

Aditya Thackeray on BMC Budget 2023
Shubhman Gill: पोरींचा दावा, शुभमन गिलचं हवा! नागपुरच्या चौकाचौकात लागले बॅनर; नेमकी भानगड काय?

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

"मुंबई महानगर पालिकेचे आज बजेट आले, बजेटपुर्वी नागरिकांच्या सुचना मागवण्यात आल्या होत्या. त्या आल्या का नाही माहित नाही, मी पत्र लिहून मागणी केली होती कि नवीन प्रोजेक्ट येऊ देऊ नका आजच बजेट बघितला तर यामध्ये नवीन बिग बजेट प्रोजेक्ट नाहीत हा आमचा पहिला विजय," असे आदित्य ठाकरे म्हणाले.

त्याचबरोबर "या बजेटमध्ये आलेले प्रकल्प आमच्याच काळातील असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 50 हजार कोटींच बजेट आहे, नवीन मोठा प्रोजेक्ट कुठं नसताना एवढे पैसे का, मग हा खर्च वाढला कुठं असा सवाल उपस्थित करत हे सामान्य माणसासाठी बजेट नसून वर्षा बंगल्यातून आलेलं बजेट आहे," असा घणाघातही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.

Aditya Thackeray on BMC Budget 2023
Satyajit Tambe : निलंबन मागे घेतलं तर पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? सत्यजित तांबे स्पष्टच बोलले

दरम्यान, यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांच्या कामावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. "स्कायवॉल्कला 75 कोटी रुपय मंजूर केले आहेत, आयुक्त ठराव आणत आहेत आणि आयुक्तच ठराव मान्य करत आहेत, या अगोदर अशी प्रथा नव्हती असे म्हणत मुंबईत लोकशाही राहिलीय कि नाही," असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com