Aditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणावर विचारला प्रश्न, आदित्य ठाकरेंनी एकाच वाक्यात विषय संपवला

आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर
Aditya Thackeray latest news update
Aditya Thackeray latest news updateSaam Tv

मुंबई - आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या बिहार (Bihar) दौऱ्यावर आहेत. बिहारला रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दिशा सालियान प्रकरणाचा आज सीबीआय अहवाल समोर आला आहे. यावर आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) विचारलं असता, मला त्या घाणेरड्या राजकारणात बोलायचं नाही, त्या चिखलात मला पडायचंच नाही. म्हणून ज्यांनी या प्रकरणात आरोप केले त्यांच्यासाठी हा अहवाल अशा शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते.

Aditya Thackeray latest news update
Mumbai Crime : BMC अधिकारी असल्याचं सांगत करत होता भलतेच कारनामे; असा अडकला जाळ्यात

तेजस्वी यादव यांची भेट घेणार

बिहार दौऱ्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "मी आज बिहार दौऱ्यावर असून मी पाटणाला जाणार आहे. त्याठिकाणी तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहे. मुख्य म्हणजे आम्ही एकाच वयाचो आहोत. ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे क्लाईमेंट चेंज आणि पर्यावरण या विषयावर चर्चा करू. माझा काही अजेंडा नाही. अनेक दिवसांपासून आमच्यात फोनवरुन चर्चा सुरु होती. आम्ही सत्तेत ते विरोधात होते. त्यावेळी अनेक वेळा बोलणे झाले होते. आज प्रत्यक्ष भेटणार आहे. थर्ड फ्रंटवर विचार करू नका त्यावर मोठे नेते बोलतील. आम्ही केवळ पर्यावरण विषयावर बोलणार आहोत असे देखिल आदित्य ठकरे यांनी स्पष्ट केले आहे.

'महाराष्ट्रासाठी मुखमंत्र्यांकडे एक तास पण नाही'

आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मंत्री मंडळ बैठकरद्द झाली कारण एक पक्ष दुसऱ्या राज्याच्या प्रचारात व्यस्त आहे. आधी आमदार, मग प्रकल्प आणि आता मंत्री गुजरातला पाठवले अशी टीका आदित्य ठकरे यांनी केली. महाराष्ट्रात बेरोजगार, ओला दुष्काळ असे असंख्य प्रश्न असताना मंत्रिमंडळ तिकडे प्रचारात व्यस्त आहे. महाराष्ट्रासाठी एक तास दिला असता तर काही वाईट झाले नसते असे देखील ते म्हणाले.

दुसऱ्या राज्यात प्रचार करावा याबाबत आक्षेप नाही, पण मंत्रिमंडळ बैठक महत्त्वाची आहे. ओला दुष्काळ आहे, निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक रद्द झाली आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने महाराष्ट्रासाठी एक तास जरी दिला तर काही चुकीचं झालं नसतं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com