मुख्यमंत्र्यांच्या वाहनातून आदित्य ठाकरेंना उतरवले; उद्धव ठाकरे सुरक्षा यंत्रणेवर भडकले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv

मुंबई: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यावरुन आता राज्य विरुद्ध केंद्र सरकार असा वाद सुरू झाला आहे. आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi)यांचे स्वागत करण्यासाठी जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवले. यामुळे मुख्यमंत्री सुरक्षा यंत्रणेवर भडकले आहेत. सकाळपासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद पाहायला मिळत आहे.

Uddhav Thackeray
सलमान खानला आलेल्या धमकी प्रकरणी नवी माहिती समोर; मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

आदित्य ठाकरे यांना सुरक्षा यंत्रणेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून उतरल्याच प्रयत्न केला, यावेळी मुख्यमंत्री सुरक्षा रक्षकावर भडकले आहेत. यामुळे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार हो वाद चांगलाच चिघळला आहे. सकाळी देहू येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते, पण त्यांना भाषण करु न दिल्यामुळे पुन्हा आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Uddhav Thackeray
तुकाराम महाराज उर्जास्त्रोत, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली - PM मोदी

गेल्या काही दिवसापासून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद सुरू आहे. याअगोदर जीएसटी वरुन राज्य सरकारने केंद्रावर आरोप केले जात होते. आता पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देहूमध्ये बोलू न दिल्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

PM मोदी, फडणवीसांचं भाषण; अजित पवारांना डावललं?

पुण्यातील देहू नगरीत झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) भाषण झालं. मात्र, या कार्यक्रमात पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचेही भाषण व्हायला हवे होते. मात्र, त्यांना डावललं गेल्याचा आरोप होत आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनाही प्रतिक्रिया दिली आहे. देहूतील कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं मला वाटतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

याबाबत विविध स्तरांतून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अजित पवार यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात बोलू न देणे हे जाणीवपूर्वक घडले आहे, असे दिसते. गेल्या वेळीही अजित पवार यांनी पंतप्रधानांसमोर राज्यातील महत्वाच्या व्यक्तीची छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील वक्तव्ये निदर्शनास आणून दिली होती. त्याचाच राग निघालेला यावेळी दिसून येतो, असे काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) ट्विटमधून म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com