भारतीय पोशाख नाकारणारे 'ते' हाॅटेल आले वठणीवर....

हिजाब परिधान केलेल्या महिलेला हाॅटेलमध्ये प्रवेश नाकारल्याची बातमी 'साम टिव्ही' ने दिल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या
- आदित्य ठाकरे
- आदित्य ठाकरे- Saam Tv

मुंबई : हिजाब परिधान केलेल्या महिलेला हाॅटेलमध्ये Hotel प्रवेश नाकारल्याची बातमी 'साम टिव्ही' Saam TV ने दिल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनीही या प्रकरणाची दखल घेत संबंधित हाॅटेलच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यानंतर हाॅटेल व्यवस्थापनाने घडल्या प्रकाराबद्दल माफी मागून आपले नियम बदलले. Aditya Thackeray Warned Mumbai Hotel for misbehavior

समाज माध्यमांवर Social Media एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओ मध्ये एक हिजाब(मुस्लिम महिला परिधान करत असलेला पोशाख) परिधान केलेली महिला रेस्टॉरंट मध्ये एक महिला जाऊ इच्छित असताना तिला या रेस्टॉरंटच्या कर्मचऱ्यानी हिजाब घातल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारल्याचे दिसले.

- आदित्य ठाकरे
शिवसेनेचे अर्धे मंत्रीमंडळ उपऱ्यांंनी भरलेले; प्रवीण दरेकरांचा घणाघात

आम्ही हिजाब आणि साडी अश्या भारतीय पोशाख परिधान केलेल्याना प्रवेश नाकारत असल्याचं या कर्मचाऱ्यांनी संमनधित महिलेच्या मित्रांना सांगितल्याच या व्हिडिओत दिसते आहे. वरळीतल्या अट्रीया मॉल मधल्या रेस्टो बार टॅपमध्ये हा प्रकार घडला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर समाज माध्यमांवर या रेस्टॉरंट चालकांवर तीव्र संताप व्यक्त केला गेला होता. Aditya Thackeray Warned Mumbai Hotel for misbehavior

त्यानंतर याच्या राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही याची दखल घेतली. वरळी येथील प्रकार हा धक्कादायक आहे...

याबाबत मनसेच्या MNS कार्यकर्त्यांनी वरळी येथील रेस्टॉरंटमधील मॅनेजरशी चर्चा केली. मात्र जर या प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही तर शंभर टक्के ते रेस्टॉरंट बंद करू, असा इशारा मनसेच्या नेत्या रिटा गुप्ता यांनी दिला होता.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com