मुंबईत घरं भाड्यानं देताना 'या' गाइडलाइन्स फॉलो करा; अन्यथा...; घरमालकांनो, दुर्लक्ष करू नका!

नागरिकांची सुरक्षा तसेच खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेला संरक्षण याकरिता काही पावलं उचलण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
mumbai news
mumbai newsSaam TV

मुंबई : मुंबईत परराज्यातून, परदेशातून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकजण इथे कामानिमित्त येतात आणि मुंबईतच घर भाड्याने घेऊन राहतात. मात्र असेही काहीजण असतात ज्यांचा उद्देश चुकीचा असते. म्हणूनच सामाजिक हित लक्षात घेत मुंबई पोलिसांनी बुधवारी मुंबईत घर भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांसाठी काही अधिसूचना जारी केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या भागात सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता, असामाजिक घटक रहिवासी भागात लपून बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांतता भंग होण्याचा धोका उद्भवू शकतो. म्हणूनच नागरिकांची सुरक्षा तसेच खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेला संरक्षण याकरिता काही पावलं उचलण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

mumbai news
Eknath Shinde : 'धर्मवीर'वरून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट; मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

मुंबई पोलीस डीसीपी, विशाल ठाकूर यांनी जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, भाडेकरूंच्या वेषात दहशतवादी, असामाजिक घटक समाजात धोका निर्माण करणाऱ्या कारवाया, दंगली घडवू नयेत म्हणून घरमालक, भाडेकरूंवर काही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही घर, मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक, व्यक्ती ज्याने कोणत्याही व्यक्तीला राहण्याची जागा भाड्याने दिली आहे त्याची माहिती त्वरित सादर करेल. www.mumbaipolice.gov.in या सिटिझन पोर्टलवर सदर भाडेकरूंचे ऑनलाइन तपशील भरावे लागतील.

mumbai news
Navi Mumbai : सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाचा लढा आजही अपूर्णच; भगवान केशभट यांनी व्यक्त केली खंत

मुंबई पोलिसांचा हा आदेश 6 जानेवारी 2023 पासून अंमलात येईल आणि 6 मार्चपर्यंत 60 दिवसांच्या कालावधीसाठी लागू होईल. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 188 अंतर्गत शिक्षेस पात्र ठरेल.

नोंदणी कशी कराल?

>> www.mumbaipolice.gov.in येथे मुंबई पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

>> होम पेजवरील रिपोर्ट यू बारवर क्लिक करा.

>> भाडेकरू माहिती टॅबवर क्लिक करा.

>> फॉर्म भरण्यासाठी खाली स्क्रोल करण्यापूर्वी नोट आणि डिस्क्लेमर काळजीपूर्वक वाचा.

>> ऑनलाइन फॉर्म भरा आणि सबमिट करा.

मुंबई पोलिसांच्या अखत्यारीतील स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन देखील ही प्रक्रिया केली जाऊ शकते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com