Pune: कोरोनानंतर MPSC च्या विद्यार्थ्यांचं बजेट कोलमडलं, खर्चात झालेय डबल वाढ

पुण्यात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांवर आता आर्थिक बोजा जास्त पडला आहे. कोरोनानंतर (Corona) पुण्यात घर भाडे, खाणावळ आणि अभ्यासिकांच्या दरात वाढ झाली आहे.
MPSC Students
MPSC StudentsSaam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : पुण्यात 'एमपीएससी'चा (MPSC) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च कोरोनानंतर वाढला आहे. या विद्यार्थ्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे. पुण्यात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांवर आता आर्थिक बोजा जास्त पडला आहे. कोरोनानंतर पुण्यात (Pune) घर भाडे, खाणावळ आणि अभ्यासिकांच्या दरात वाढ झाली असून या सर्व दरवाढीचा फटका एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. सरकारने अभ्यासिकांचे दर नियंत्रित ठेवावेत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

दोन वर्षांपूर्वीचे आणि आत्ताचे दर पुढीलप्रमाणे -

दोन वर्षांपूर्वीचे मासिक दर -

खाणावळ - 1500 ते 2000

रुम भाडे - 2000 ते 2500

अभ्यासिका - 500 ते 1000

MPSC Students
'शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर, बारणे काय म्हणतायत ते बघा; पक्ष वाढीचं सोडा आहे तो टिकवा'

आत्ताचे मासिक दर

खाणावळ - 2500 ते 3500

रुम भाडे - 3500ते 4500

अभ्यासिका - 1200 ते 2500

कोरोनामुळे (Corona) आपापल्या गावी गेलेले विद्यार्थी अभ्यासासाठी पुण्यात परतले खरे मात्र राहणे, खाणे आणि अभ्यासिकेचा खर्च वाढल्याने चिंतेत पडलेत. MPSC करण्याऱ्या विद्यार्थ्यांचीही परिस्थिती पाहून सरकारकडून शिकवणी आणि अभ्यासिकांच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही विशेष प्रयत्न करतात का हे पाहावं लागणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com