भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार पत्नीसह नॉट रिचेबल

घर व कार्यालयातील झडती मध्ये मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त
Navghar Police Station
Navghar Police StationSaam Tv

मीरारोड - नरेंद्र मेहता यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कोट्यावधींची बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करताच भाजपाचे (BJP) माजी आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या पत्नी पसार झाले आहेत.

२००२ साली अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले नरेंद्र मेहता हे २०१७ पर्यंत नगरसेवक होते. या दरम्यान नरेंद्र मेहता हे महापौर, विरोधी पक्ष नेता, प्रभाग समिती सभापती पदांवर ते राहिले . २०१४ ते २०१९ दरम्यान ते भाजपाचे आमदार होते. २००२ साली नगरसेवक निवडणून येताच काही महिन्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणी लाच घेताना मेहतांना रंगेहाथ अटक केली होती. सदर प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

हे देखील पाहा -

तर २०१५ - १६ दरम्यान तत्कालीन लोकायुक्त एम . एल . ताहिलयानी यांनी मेहतांची भ्रष्टाचार व अपसंपदा बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत चौकशी लावली होती . सदर ठाणे व पालघर युनिट तेव्हा पासून चौकशीच करत होते .

त्या दरम्यानच्या काळात अनेक अधिकारी बदलले.या प्रकरणी राजू गोयल, कृष्णा गुप्ता यांनी सतत तक्रारीचा पाठपुरावा करून अखेर ६ वर्षांनी एसीबीचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांनी १९ मे रोजी नवघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार नरेंद्र मेहता व पत्नी सुमन मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच मेहता हे पसार झाले असून त्यांच्या सह त्यांची पत्नी सुद्धा असल्याचे समजते.

Navghar Police Station
Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेल पुन्हा वाढणार? पाहा आजचे दर

गुन्हा दाखल झाल्या नंतर एसीबीच्या पथकाने त्यांचा शगुन बंगला व सेव्हन स्क्वेअर शाळेतील मेहता व त्यांच्या कंपन्यांच्या कार्यालयावर छापेमारी केली . मेहतांच्या कार्यालयात सकाळ पर्यंत पथक होते . पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आदी जप्त करून ठाणे एसीबी कार्यालयात नेली आहेत . नरेंद्र व सुमन मेहता यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन दोघेही पसार झाल्याची चर्चा शहर व समाज माध्यमांवर देखील होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार एसीबीने मेहतांनी बायकोला भेट दिलेली ३ कोटींची लंबोरगिनी सह आलिशान गाड्या, दीड कोटीचे दागिने आदी नोंदी केल्याचे समजते. दरम्यान ही नरेंद्र मेहता यांची २०१९ पर्यंतची चौकशी असून त्याच्या पुढील वर्षाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे तक्रारदार कृष्णा गुप्ता यांचे म्हणणे आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com