
अभिजीत देशमुख
Uday Samant News : उद्योग मंत्र्यांच्या उदय सामंत यांनी टाकलेल्या धाडीनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पथक आज संदप गावात दाखल झाले. तिन्ही ठिकाणी पाहणी करत या ठिकणी नळ जोडनी अनधिकृत आहेत का? या ठिकाणी पाणी आहे का ? याची तपासणी सुरू केली.
यामधील मिनरल वॉटर कारखान्याला बोअरवेलचे पाणी असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आले. दरम्यान संबंधित मालकाने बोअरिंगची परवानगीची कागदपत्र महापालिकेला सादर केली असून त्याची शहानिशा सुरू असल्याचं महापालिका अधिकाऱ्यानी सांगितलं. (Latest Marathi News)
कल्याण डोंबिवली (Dombivli) महापालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये भेडसावणाऱ्या पाणीटंचाईची शासनाने दखल घेतली आहे . 27 गावांमधील संदप गाव परिसरात टँकर माफियांकडून मोठ्या प्रमाणात पालिकेच्या पाईप लाईनमधून पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या .
या पार्श्वभूमीवर काल उद्योग मंत्री उदय सन्मान यांनी संत परिसरात तीन ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. या ठिकाणी टॅपिंग करत पाण्याचा कारखाना तर दोन ठिकाणी टॅपिंग करत टँकर भरला जात असल्याचे उघडकीस आणले. याप्रकरणी मानपाडा पोलीस (Police) ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आलेत.
मंत्र्यांच्या धाडीनंतर खडबडून जागे झालेल्या केडीएमसी (KDMC) प्रशासनाचे पथक आज संदप गावात दाखल झाले. त्यांनी मिनरल वॉटरच्या प्लांट्ससह इतर दोन ठिकाणी देखील तपासणी सुरू केलीये . सध्या या मिनरल वॉटरच्या प्लांटमध्ये पाणी कुठून येते तसंच इतर दोन ठिकाणी कोणती पाण्याची पाईपलाईन आहे याबाबत शोध मोहीम सुरू आहे.
याबाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी पहिल्या ठिकाणी तपासणी केली असून मिनरल प्लांटमध्ये बोअरिंग मधून पाणी असल्याचे दिसून आले. सदर बोअरवेलची संबंधित मालकाकडे परवानगी असून ते परवानगी पत्र ते महापालिकेला सादर करणार असल्याचे सांगितले.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.