नात्याला काळीमा! व्हिडीओ बघून भावाने केला 3 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार

पुण्याच्या भोसरी मधील धक्कादायक घटना !
नात्याला काळीमा! व्हिडीओ बघून भावाने केला 3 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार
नात्याला काळीमा! व्हिडीओ बघून भावाने केला 3 वर्षाच्या बहिणीवर बलात्कारSaam Tv

पुणे : सांस्कृतिक पुण्यात (Pune) गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचार, छळ, बलात्कार अश्या गुन्हेगारीविषयक घटना सातत्याने घडून येताना दिसत आहेत. मात्र, पालकांना धक्का बसावा अशी एक घटना भोसरी (Bhosari) परिसरात घडली आहे. एका विधीसंघर्ष मुलाने सख्ख्या ३ वर्षाच्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनाही धक्का बसला आहे.

हे देखील पहा-

भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी माहिती दिली आहे. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) भोसरी परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय बालगुन्हेगाराने भावाने तीन वर्षाच्या सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. माहितीनुसार, अभ्यास करत असताना युट्युबवरील (You Tube) अश्लील व्हिडिओ (Adult Video) पहिला आणि त्यानंतर हे अश्लील कृत्य केल्याची कबुली त्याने आपल्या आई-वडिलांना दिली आहे. हा सर्व प्रकार ऑगस्ट महिन्यात घडलेला होता आणि आता तो समोर आला आहे.

नात्याला काळीमा! व्हिडीओ बघून भावाने केला 3 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार
Breaking: आरोग्यभरती पेपरफुटी प्रकरणात आणखी तिघांना अटक !

आईवडिल कामावर गेले अन् मग...

ऑगस्ट महिन्यात भाऊ बहीण (बालगुन्हेगार मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी) घरी होते. आईवडिल कामावर गेले होते तेव्हा, गेल्यानंतर भावाने वडिलांच्या मोबाईलमध्ये युट्यूबवर अश्लील चित्रफित पाहिली. तेव्हा त्याने घरात एकट्याच असलेल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केला. या प्रकारानंतर चिमुकलीला वेदना झाल्या त्यामुळे आई-वडिलांनी तिला उपचारासाठी पिंपरीतील एका रुग्णालयात नेले.

डॉक्टरांनी तिला तपासलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर चिमुकलीला विश्वासात घेतं, आई-वडिलांनी या अत्याचाराबाबत विचारणा केली. त्यावर आपल्यावर, मोठ्या दादानेच हे कृत्य केल्याचं तिने आई-वडिलांना सांगितले.

पोलीस पीडितेच्या घरी गेले त्यावेळेस मात्र कुटुंबियांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. 'मुलगा आणि मुलगी दोन्ही आमच्याच रक्ताचे आहेत, त्यामुळे आम्हाला कोणाविरुद्धसुद्धा तक्रार द्यायची नाही,' अशी भूमिका यावेळी कुटुंबियांनी घेतली होती. आईवडिलांनी नकार दिल्यानंतर पोलिसांनी मात्र, या पालकांचे मन परिवर्तन करून त्यांना तक्रार देण्यासाठी तयार केले.

आता भोसरी पोलीस ठाण्यात युट्युबवरील अश्लील व्हिडिओ पाहून बलात्कार केल्याप्रकरणी 14 वर्षाच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल (Crime) करण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com