पुण्यासारख्या जिल्ह्यात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार!

पाबळच्या स्मशानात अंधश्रध्देचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे.
पुण्यासारख्या जिल्ह्यात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार!
पुण्यासारख्या जिल्ह्यात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार!रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे :-पुण्यासारख्या Pune जिल्ह्यात आता अंधश्रद्धेचे superstition अघोरी प्रकार समोर येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाबळ Pabal या गावांमधील स्मशानभूमी अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. 

गावच्या स्मशानभूमीमध्ये एक दशक्रिया विधी सुरू असताना, गावकऱ्यांना त्या ठिकाणी एका काळ्या पिशवीवर कोहळ्याचा भोपळा ठेवून त्यावर टाचणी टोचून मुलीचा फोटो लावण्यात आला होता. तसेच त्या फोटोवर लिंबू, हळद- कुंकू इतर गोष्टी वाहिलेल्या दिसून आल्या आहेत.

हे देखील पहा-

ही गोष्ट समजल्यावर काही वेळ खळबळ माजली होती. मात्र पुण्यासारख्या सुसंस्कृत जिल्ह्यात अशा प्रकारे मुलीचा फोटो लावून स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार केल्याने गावकरी गांगरून गेले होते. मात्र आजच्या विज्ञान युगात अजूनही अंधश्रद्धा पोसल्या जात असल्याचे वास्तव हे पुण्यासारख्या जिल्ह्यात समोर येत आहे.

पुण्यासारख्या जिल्ह्यात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार!
चंद्रपूरच्या महापौरांसाठी ११ लाखांची कार; नंबरसाठी हजारोंचा खर्च!

मुलीचा फोटो ठेवत अंधश्रद्धेला खतपाणी या ठिकाणी घातले गेले असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी या प्रकाराबाबत माहिती मिळाल्यास त्वरित संबंधित पोलिस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com