कृषी विषय केंद्राचा कि राज्याचा? सर्वोच्च न्यायालयानं सांगावं - प्रकाश आंबेडकर

आमची विनंती आहे की 'कृषी' हा विषय केंद्राचा आहे की राज्याचा आहे या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी आहे.
कृषी विषय केंद्राचा कि राज्याचा? सर्वोच्च न्यायालयानं सांगावं - प्रकाश आंबेडकर
कृषी विषय केंद्राचा कि राज्याचा? सर्वोच्च न्यायालयानं सांगावं - प्रकाश आंबेडकरSaam TV

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर अनेक प्रतिक्रिया उमटतायत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कृषी विषय केंद्राच्या अखत्यारीत येतो कि राज्याचा अखत्यारीत येतो हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे (Agriculture subject of Central Government or State Government? Supreme Court should tell - Prakash Ambedkar)

हे देखील पहा -

अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे, मात्र हे कायदे संसदेत मागे घेतल्या गेले तरच त्याला अर्थ आहे. दुसरे असे की याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांची याचिका आहे. आमची विनंती आहे की 'कृषी' हा विषय केंद्राचा आहे की राज्याचा आहे या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

कृषी विषय केंद्राचा कि राज्याचा? सर्वोच्च न्यायालयानं सांगावं - प्रकाश आंबेडकर
'दाढीवाला बाबा काही पण करीत असताे, त्यावर विश्वास ठेवू नका'

गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून हे शेतकरी दिल्लीतील विविध सीमांवर ठाण मांडल आंदोलन केलं आहे. अखेर हे तीन कायदे रद्द होत असल्याने शेतकऱ्यांच्या लढ्याला यश मिळालं आहे. येत्या महिन्याभरात हे कायदे मागे घेण्याची कायदेशीर प्रकिया पुर्ण होईल असं मोदी म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com