अहिल्यादेवी हिंदू राजमाता; गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याने नवा वाद

गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी केली आहे.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSaam Tv

मुंबई: भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar district) नामांतराचा विषय समोर आणला आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून 'अहिल्यादेवी नगर' (Ahilyadevi Nagar) करा अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. पडळकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी यांचा 'अहिल्यादेवी हिंदू राजमाता' असा उल्लेख केला आहे. यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

अहिल्यादेवी होळकरांना महाराष्ट्र पुण्यश्लोक म्हणून ओळखतात, पण गोपीचंद पडळकर यांनी 'अहिल्यादेवी हिंदू राजमाता' असा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 'राजा अथवा राणी असतात ते जनतेची सेवा करत असतात त्या राजांना हिंदु म्हणून उल्लेख करणे चुकीचे आहे.'अशी प्रतिक्रीया ओबीसी अभ्यासाक श्रावण देवरे यांनी दिली.

हे देखील पाहा

पडळकर यांच्या या वक्तव्यावर महादेव जानकर यांनीही प्रतिक्रीया दिली. एका जातीच्या चौकटीत महान व्यक्तीला अडकणे हे चुकीचे आहे. अहिल्यादेवी होळकरांनी मुस्लिम, ख्रिश्चनांनाही मदत केली आहे. त्यामुळे त्या कोणत्याच धर्माच्या नव्हत्या. एखाद्या जातीत तेढ निर्माण करणे हे बरोबर नाही, असंही जानकर म्हणाले.

Gopichand Padalkar
RTO च्या 'या' सुविधेचा घरबसल्या मिळणार लाभ; १७ ते १८ लाख नागरिकांना होणार फायदा

अहमदनगरचे नाव बदलून 'अहिल्यादेवी नगर' करा

गोपीचंद पडळकर यांनी (Gopichand Padalkar) अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून 'अहिल्यादेवी नगर' (Ahilyadevi Nagar) करा अशी मागणी केली आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. या मागणीचा व्हिडिओही पडळकर यांनी ट्विट केला आहे.

"हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे. नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल. जय अहिल्या,जय मल्हार..." असं ट्विट आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com