
मुंबई : मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (Shivsena) विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना मान्यता देण्यात आली आहे. विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ही मान्यता दिली आहे. विशेष बाब म्हणजे याच गटनेते पदावर एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दावा केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेला हा दावा मान्य करण्यात आला नाही. (Eknath Shinde Latest News)
नियमानुसार आता शिवसेना गटनेता पदावर अजय चौधरी यांनाच मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची नोंद विधिमंडळात झाली असल्याचं समजतंय. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की, गटनेतेपदी पक्षप्रमुख ज्यांची नेमणूक करतात. तिच नेमणूक ग्राह्य धरली जाते. त्यामुळे सुरूवातीला अजय चौधरी ही ग्राह्य धरण्यात आली. आता एकनाथ शिंदे यांनी कितीही दावे केले तर, शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी अजय चौधरीच राहणार आहे.(Ajay Choudhari News)
बंडखोरी केल्याच्या तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांसह विधानसभा उपाध्यक्ष आणि विधानसभेच्या सचिवांना पत्र पाठवलं होतं. आपण गटनेते असल्याचा दावा केला. तर भरतशेट गोगावले प्रतोद असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या या पत्रावर शिवसेनेच्या दोन तृतीअंश आमदारांच्या स्वाक्षऱ्या देखील होत्या. त्यामुळे शिवसेना गटनेतेपद शिवसेनेच्या हातातून जाणार की काय? अशी चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती केली. अजय चौधरी यांच्या निवडीची घोषणा होताच शिवसेना प्रतोद सुनील प्रभू, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली होती. आज नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आता शिंदे गट काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.