दुधाच्या FRP बाबत अजित पवारांनी दूध उत्पादकांना दिले आश्वासन, म्हणाले...

दूध खरेदी दराच्या अस्थिरतेमुळे राज्यात दूध उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरचे दर व नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रातील दुधाचे दर पडल्यामुळे दूध उत्पादकांना वारंवार संकटाचा सामना करावा लागतो.
दुधाच्या FRP बाबत अजित पवारांनी दूध उत्पादकांना दिले आश्वासन, म्हणाले...
Ajit Pawar About Milk FRPSaam TV

मुंबई : दुधाला FRP चे संरक्षण मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्री समितीने, शेतकरी व शेतकरी प्रतिनिधींचे म्हणणे समजून घेऊन याबाबत आपला अहवाल तयार करावा असे निवेदन करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधी मंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री व दुध FRP बाबत स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांची देवगिरी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेत याबाबतचे निवेदन दिले.

यावेळी अजित पवार यांनी दुधाच्या एफ.आर.पी. (Milk FRP) बाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील शेतकरी व शेतकरी प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल तसेच दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल अशा प्रकारचे आश्वासन दिले.

दूध (Milk) खरेदी दराच्या अस्थिरतेमुळे राज्यात दूध उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरचे दर व नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रातील दुधाचे दर पडल्यामुळे दूध उत्पादकांना वारंवार संकटाचा सामना करावा लागतो.

हे देखील पाहा -

दूध क्षेत्रातील ही अनिश्चितता संपवण्यासाठी व दुधाला किमान आधारभाव मिळावा यासाठी दुधाला एफ.आर.पी.चे संरक्षण लागू करावे व दूध तसेच दुग्धपदार्थांच्या निर्मिती व विक्री मध्ये तयार होणाऱ्या नफ्यात शेतकरी कुटुंबाला रास्त वाटा मिळावा यासाठी दूध क्षेत्राला रेव्हेन्यू शेअरींगचे धोरण लागू करावे यासह प्रमुख मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सातत्याने संघर्ष करत आहे.

संघर्ष व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुधाला एफ.आर.पी. लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. मंत्रिगटाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन दूध उत्पादकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे शिवाय मिल्को मीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवावी, दुधातील भेसळ बंद करण्याबाबत ठोस पावले टाकली जावीत, राज्यात दुग्धमूल्य आयोगाची स्थापना करून दूध उत्पादकांना न्याय द्यावा, पशुखाद्याच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत धोरण घेतले जावे, दूध क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी दूध संघांना संरक्षण देऊन सहकार मजबूत करण्यासाठी अधिक गांभीर्यपूर्वक धोरणे घेतली जावीत.

Ajit Pawar About Milk FRP
सैन्यदलात ४ वर्षे काम करण्याची तरुणांना संधी, काय आहे अग्निपथ योजना?

खाजगी कंपन्यांच्या लुटमारीच्या विरोधामध्ये कायदा करावा यासह नऊ मागण्यांचे निवेदन यावेळी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. यावेळी दूध प्रश्नांचे अभ्यासक श्री. सतीश देशमुख व दूध उत्पादक शेतकरी श्री. खंडूबाबा वाकचौरे हे यावेळी उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com