पुण्यातील कोरोना निर्बंध जैसे थे !; अजित पवारांची माहिती
पुण्यातील कोरोना निर्बंध जैसे थे !; अजित पवारांची माहितीSaam Tv

पुण्यातील कोरोना निर्बंध जैसे थे !; अजित पवारांची माहिती

राज्यातिल 30 टक्के रक्क्म कोरोनासाठी राखीव असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती (Pune Coronavirus) आणि बाणेर मधिल कोविड रुग्णालयाची पाहणी झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) माध्यमांशी बोलत होते. पुण्यातील कोराना निर्बंधांबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले पुण्यातील कोरोनाची परिस्थिती आणखी कमी झालेली नाही. त्यामुळे, पुण्यात कोरोनाचे निर्बंध पहिल्या सारखेच असतील. पुण्यासह इतर काही जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिव्हीटी दर जास्त आहे. त्यामुळे कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलेली नाही.

राज्यातिल 30 टक्के रक्क्म कोरोनासाठी राखीव असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे. सगळ्या आमदार आणि खासदारांच्या सुचना ऐकून घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. बकरी ईदसाठी मागच्या वर्षी जी नियमावली होती तिच यावर्षीही राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. कोरोना बाधित रुग्णांचे गृह विलगिकरण न होता संस्थात्मक विलगिकरण व्हावे असे डॉ. साळूंके यांनी सुचवल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्योजकांनी कामगारांचे लसीकरण हे कंपनी मध्येच करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. पुण्यामध्ये लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे. मुख्यमंत्री लसीकरणाची गती आणखी वाढावी यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे.

पुणे महानगरपालिकेत गेलेल्या 23 गावांबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले विकास कोणी करायचा हा प्रश्न महत्त्वाचा नाही. तो पीएमआरडीएने करावा किंवा महानगरपालिकेने करावा पण तो चिरकाल टिकेल असा करावा. पुढची 100 वर्षे टिकेल असा विकास करावा. या गावांमध्ये फायर ब्रिग्रेडची सुविधा करावी लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. पुण्याच्या धरणातील पाणी साठ्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले धरणात अजून 20-21 टक्के पाणी साठा आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com