गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष?

होर्डिंग प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल
गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष?
गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष?saam tv

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून पुण्यामध्ये राजकारण तापलेले आहे, याच मुद्द्यावरून गुन्हेगारांनीही होर्डिंग लावले असल्याचा प्रश्न पत्रकारांकडून पालकमंत्री अजित पवारांना आज विचारण्यात आला, यावेळी उत्तर देताना पवार म्हणाले  गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितले का? गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष? चुकीचे होर्डिंग असतील तर पोलिसांनी ते काढावे  इथे भाजपची सत्ता आहे इथल्या सत्ताधाऱ्यांनी कारवाई करावी असेही पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर पत्रकारांसोबत ते बोलत होते.

हेदेखील पहा

दरम्यान सध्या बहुचर्चित असलेल्या पेगसीस प्रकरणावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली, कायद्याचा दुरुपयोग करणे वाईट गोष्ट आहे, संसदेत सध्या याच प्रश्नावर चर्चा सुरु आहे पण ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत त्यानुसार कुठे तरी पाणी मुरत आहे हे नक्की. त्यामुळे संसदेमध्ये सरकारने सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत ही अपेक्षा आहे असे पवार म्हणाले, 

गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष?
पाच राज्यांना रेड अलर्ट; मुंबईत समुद्रात हायटाईडचा इशारा

तसेच कोरोना लास घेण्याबाबत लोकांची मानसिकता आता झालेली आहे ही सकारात्मक बाब असून लोकसंख्येच्या प्रमाणत लस मिळायला हवी, लस उपलब्ध होत नसल्याने  लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचे अजित पवारांनी सांगितले, जुलै मध्ये केंद्राने  लस मिळेल असे सांगितले होते पण अजूनही पुरेशी लस मिळालेली नाही त्यामुळे लसीकरणाला वेळ लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तसेच शाळा सुरु करण्यासंदर्भात प्रत्येक विभागाचे मत आहे, मात्र पुढील शंभर दिवस महत्वाचे आहे, ग्रामीण भागात लोक अजूनही जबाबदारीने वागत नाही, यंत्रणांनी सध्याची शिथीलता अधिक कठोर करायला हवी असे पवार यांनी सांगितले. दरम्यान सचिन वाझे प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असून तपास यंत्रणा योग्य माहिती समोर आणतील,माझा कुणासोबतही संबंध नाही, महाराष्ट्र मला तीस वर्षांपासून ओळखतो असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Edited by Ashwini jadhav kedari

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com