पुणे म्हाडाच्या 4253 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ

पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचं स्वप्न पूर्ण
पुणे म्हाडाच्या 4253 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ
पुणे म्हाडाच्या 4253 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा अजित पवारांच्या हस्ते शुभारंभSaam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या 4 हजार 253 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्विकृतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.

हे देखील पहा -

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे म्हाडाच्या 4253 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ
बोली पद्धतीने आणले शेतकऱ्यांचे 'अच्छे दिन'; अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पद्धत

पुणे म्हाडाच्या माध्यमातून पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या 4 हजार 253 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात झाली. जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात ही सोडत निघणार आहे. पुणे म्हाडाची ‘जानेवारी 2022-ऑनलाईन सोडत’ योजना राज्यातल्या अनेक गरजूंचं, पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com