Ajit Pawar News: अमोल कोल्हेंची उमेदवारी धोक्यात? अजित पवार म्हणाले, आणखी कुणी इच्छुक असेल तर बिघडलं काय?

Ajit Pawar on Amol Kolhe: आधी महाविकास आघाडीत कुठल्या जागा कुणाला जातात हे ठरेल.
Ajit Pawar on Amol Kolhe
Ajit Pawar on Amol Kolhe Saam TV

Shirur Loksabha: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु झाल्याचं दिसून येत आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील विद्यमाना खासदार अमोल कोल्हे यांच्यासह याठिकाणी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील इच्छुक आहेत. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कारण नसताना या चर्चा सुरु आहेत. एखाद्या पक्षातून अनेकजण इच्छूक असतील तर त्यात बिघडलं काय? उद्या अजित पवार शिरुर मतदारसंघातून इच्छूक झाला तर तु्म्हाला काही त्रास होणार आहे का? आमच्या पक्षातील विलास लांगे माजी आमदार राहिले आहेत. त्यांना मी महापौर केलं होते. त्यांनी खासदारकीची निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांना अपयश आलं होतं. (Latest News Update)

Ajit Pawar on Amol Kolhe
Amol Kolhe On Sharad Pawar: 'पवारसाहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते तोरण', अमोल कोल्हेंनी शिरुर लोकसभेचा चेंडू टाकला शरद पवारांच्या कोर्टात

आता कदाचित त्यांना काही गोळाबेरीज केली असेल. आता तिथे विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचीही माहिती घेतली आहे. मात्र यासंबंधीचा निर्णय आमच्या पक्षातील आहे. आधी महाविकास आघाडीत कुठल्या जागा कुणाला जातात हे ठरेल. त्यात आमच्या वाटेला ज्या जागा येतील तिथे आम्ही उमेदवार देऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं.

अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीत मीच आणलं. त्यानंतर त्यांना शिरुर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देखील दिली आणि तेथून ते निवडून देखील आले, याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.

Ajit Pawar on Amol Kolhe
Eknath Shinde Announcement: किल्ले रायगडावरून CM शिंदेंची मोठी घोषणा; उदयनराजेंकडे सोपवली महत्वाची जबाबदारी

अमोल कोल्हे काय म्हणाले होते?

'पवारसाहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते तोरण' असं म्हणत अमोल कोल्हे यांनी शिरुर मतदार संघाबाबतचा निर्णय शरद पवारच घेतली असे सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com