'शहाण्या तू आमदार आहे'; अजितदादांनी रोहित पवारांना मास्कवरुन सुनावलं!

'अरे शहाण्या.. तू आमदार आहेस.. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल'.
'शहाण्या तू आमदार आहे'; अजितदादांनी रोहित पवारांना मास्कवरुन सुनावलं!
'शहाण्या तू आमदार आहे'; अजितदादांनी रोहित पवारांना मास्कवरुन सुनावलं! Saam TV

बारामती: काल कर्जत जामखेडला गेल्यानंतर तिकडे कोणीच मास्क वापरत नव्हतं. आमचा रोहितच वापरत नव्हता. रोहितला म्हटलं, अरे शहाण्या.. तू आमदार आहेस.. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही अन् लोक मास्क वापरत नाही, हे बरोबर नाही असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जर तिसरी लाट आली तर त्याची मोठी किम्मत मोजावी लागेल, त्यामुळं टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशारा दिला आहे. बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं.

दरम्यान अजीत पवारांनी कर्जत जामखेड या भागात अनेक विकास कामांचं उद्घाटन केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेण्याचे आवाहन करताना औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचं उदाहरणंही अजीत पवारांनी दिले यावेळी दिलं आहे. "आता कोरोना गेला असं तुम्हाला वाटतं असेल पण तो परतही येऊ शकतो, ते तुम्हाला समजणारही नाही. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन डोस घेतलेल्या लोकांचीच काम मार्गी लागतील अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळं असा कठोर निर्णय घ्यायला आम्हाला भाग पाडू नका" असा इशारा अजीत पवारांनी दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com