कारखाने कितीला आणि कोणते विकले याची यादी दोन दिवसात देईन- अजीत पवार

काँग्रेस नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. त्यावर बोलताना अजीत पवार म्हणाले, ''आघाडीचे सरकार होते तेव्हाही असे प्रवेश झाले आहेत.
कारखाने कितीला आणि कोणते विकले याची यादी दोन दिवसात देईन- अजीत पवार
कारखाने कितीला आणि कोणते विकले याची यादी दोन दिवसात देईन- अजीत पवारSaamTvNews

काँग्रेस नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. त्यावर बोलताना अजीत पवार म्हणाले, ''आघाडीचे सरकार होते तेव्हाही असे प्रवेश झाले आहेत. काँग्रेसचा राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये येतो, त्याला बाहेर जाऊ द्यायचा नाही.'' जरंडेश्वर कारखान्यावर सुरु असलेल्या चौकशीबाबत बोलताना अजीत पवार म्हणाले जरंडेश्वर कारखान्याची केस ईडीकडे आहे, कोर्टात आहे. राज्यात ज्यावेळी भाजपचं सरकार होतं त्यावेळी एसीबी, सीआयडी, EoW यांच्यावतीने चौकशी झाली. राज्यात केवळ जरंडेश्वर एकटा कारखाना नाही.'' मी एक दोन दिवसात कारखाने कितीला आणि कोणते विकले गेले याची यादी देईन. काही काही कारखाने ३ कोटी, ४ कोटी अशा पद्धतीने विकले गेले आहेत. हे कारखाने कर्ज थकले म्हणून सहकार विभागाने हायकोर्टाच्या कमिटीच्या नियंत्रणाखाली विकले गेले आहेत, पण जाणीवपूर्वक त्याच गोष्टी वारंवार दाखवल्या जात असल्याचे अजीत पवार बोलले.

कारखाने कितीला आणि कोणते विकले याची यादी दोन दिवसात देईन- अजीत पवार
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली समोर संघ निवडीबाबत चिंता

माझ्या बद्दल काही लोकांनी बेईमानी केली म्हणून गरळही ओकली परंतु मी बेईमान आहे की कामाचा हे महाराष्ट्राला माहित असल्याचे मत अजीत पवारांनी व्यक्त केलं आहे. मी बेईमानी कधी केली नाही, ते आमच्या रक्तात नाही. मी उद्या प्रेस घेऊन सविस्तर बोलणार आहे. कारखाने कोणते विकले कुणी विकत घेतले, काही बिल्डरांनी घेतले, काही राजकीय पक्षाच्या संबंधित लोकांनी घेतले आहेत. त्याबाबत बोललं जात नाही, पण माझ्या नातेवाईकांबाबत बोललं जातंय. ईडीने जप्ती केली आहे, कारखाने त्यांच्याबद्दल काय ते ईडीला सांगतील असे मत अजीत पवारांनी व्यक्त केलं आहे. छगन भुजबळांवर झालेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले ''मागील काळात भुजबळांचीही अशी बदनामी केली गेली, त्यांचा दोन वर्षांचा काळ वाया गेला परंतु नंतर ते निर्दोष सुटले.''

राजू शेट्टींनी काल त्यांच्या भाषणात अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली त्यावर बोलताना अजीत पवार म्हणाले निर्णय घेताना ठरवलं पाहिजे पश्चाताप होतो का नाही. सगळ्यांना १०० टक्के समाधानी करू शकत नाही. शेतकऱ्यांना सरकारने जाहिर केलेल्या मदतीवर बोलताना अजित पवार म्हणाले मदत द्यायचीच आहे, जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्याची माहिती आली की तातडीने पैशांचे वाटप करा अशा सूचना दिल्या आहेत. येणार्‍या मंत्रीमंडळात या वाटपाची माहिती घेतली जाईल. मी आजच किती पैशांचे वाटप झाले किती शिल्लक आहेत त्याची माहिती घेणार असल्याचे पवार म्हणाले. विमा कंपन्यांचे अधिकारी शेतकर्‍यांशी अड्डलपणे वागत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल केल्या जातील असे अजीत पवार म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com